सभाजीनगर: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संभाजीनगर लॉकडाउनचा निर्णय मागे घेतल्यावर खासदार इम्तियाज जलील यांना खांद्यावर बसून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. यादरम्यान कोरोना नियम पायदळी तुडवत शेकडो कार्यकर्त्यांनी विनामास्क जल्लोष केला होता.याबाबत कोणीही कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे जलील यांच्यावर गुन्हा दाखल होणार असून शंभर टक्के त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली
खासदर जलील यांना खांद्यावर बसवून जल्लोष
मागील हफ्त्यात लॉकडाउनच निर्णय जाहीर केल्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी ३१ मार्चला मोर्चाचे आयोजन केले होते. जलील यांच्यावतीने लॉकडाऊन रद्द केल्यानंतर त्यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्ते जल्लोष करत होते. त्याबाबत चव्हाण म्हणाले सामान्य माणसावर जशी कारवाई होते त्याच पद्धतीने लोकप्रतिनिधीने नियम मोडला तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच लोकांनी नियमांचे पालन करावे अश्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.