सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ‘मंदिर रक्षा अभियान’ या विषयावर परिसंवाद !

विकासाच्या नावाखाली ओडिशामधील अनेक प्राचीन मठ तेथील शासनाने नष्ट केले. यामुळे अनेक मंदिरे आणि प्राचीन ग्रंथसंपदा नष्ट झाली. अनेक प्राचीन मूर्तींची चोरी झाली. स्थानिक हिंदूंनी या विरोधात न्यायालयात याचिका केली;

Snehal Joshi .
  • Aug 7 2020 4:58PM
धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या रक्षणासाठी केंद्र शासनाने कायदा करावा ! - अनिल धीर, राष्ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच, ओडिशा वर्धा - विकासाच्या नावाखाली ओडिशामधील अनेक प्राचीन मठ तेथील शासनाने नष्ट केले. यामुळे अनेक मंदिरे आणि प्राचीन ग्रंथसंपदा नष्ट झाली. अनेक प्राचीन मूर्तींची चोरी झाली. स्थानिक हिंदूंनी या विरोधात न्यायालयात याचिका केली; मात्र न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मठ-मंदिरे तोडल्यामुळे हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा नष्ट होत आहे. त्यांचे रक्षण करण्यासाठी केंद्रशासनाने कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ओडिशा येथील ‘भारत रक्षा मंच’चे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था आयोजित ऑनलाईन नवम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ते बोलत होते. हे अधिवेशन हिंदु जनजागृती समितीच्या ‘यू-ट्यूब’ चॅनल आणि ‘हिंदु अधिवेशन’ या ‘फेसबूक पेज’द्वारे लाइव्ह प्रसारित होत असून 54 हजारांहून अधिक लोकांनी ते प्रत्यक्ष पाहिले, तर 2 लाखांहून अधिक लोकांपर्यंत हा विषय पोचला. या वेळी तेलंगाणा येथील शिवसेना राज्यप्रमुख श्री. टी.एन्. मुरारी म्हणाले की, हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा असलेली मंदिरे वाचली, तर धर्म वाचेल. त्यामुळे मंदिरांच्या रक्षणासाठी मोदी शासनाने एका धार्मिक परिषदेची निर्मिती करावी. ‘इटर्नल हिंदू फाऊंडेशन’चे श्री. संजय शर्मा या वेळी म्हणाले की, मंदिरे ही सामाजिक जागृतीची केंद्रे व्हायला हवीत. मंदिरांतून ‘सी.ए.ए’, ‘एन्.आर्.सी.’ आदी कायदे आणि धर्म यांविषयी जागृती झाल्यास स्वदेशीच्या घोषणेला बळ प्राप्त होईल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारता’च्या घोषणेच्या दिशेने वाटचाल करता येईल. राजस्थान येथील वानरसेनेचे अध्यक्ष श्री. गजेंद्र भार्गव या वेळी म्हणाले की, मंदिरांतील अंतर्गत व्यवस्थेसह बाहेरील व्यवस्थाही तितकीच महत्त्वाची आहे. बहुसंख्य मंदिरांच्या जागा आणि तेथील दुकाने हे आक्रमकांचे अड्डे झाले आहेत. याचे हिंदूंनी चिंतन करायला हवे. हिंदु युवकांना आपल्या संस्कृतीचे महत्त्व सांगितल्यास ते मंदिरांच्या रक्षणासाठी संघटित होतील. मंदिरांवरील विविध आघातांच्या संदर्भात ‘मंदिर रक्षण’ परिसंवादात मान्यवरांचा सहभाग ! तामिळनाडू येथील ‘टेंपल वर्शिपर्स सोसायटी’च्या उपाध्यक्षा श्रीमती उमा आनंदन् या परिसंवादात भाग घेतांना म्हणाल्या की, चर्च आणि मशिदी यांसाठी जगभरातील सर्व ठिकाणी नियम सारखेच आहेत; मात्र मंदिरांसाठी वेगळे नियम आहेत. ज्याप्रमाणे चर्चचे फादर आणि मशिदींचे मौलवी त्यांच्या प्रार्थनास्थळांचे व्यवस्थापन पहातात, त्याप्रमाणे मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे द्यायला हवे. या वेळी आंध्रप्रदेश येथील इतिहासकार श्री. बी.के.एस्.आर्. अय्यंगार म्हणाले की, 100 वर्षांपूर्वीचे मठ, मंदिरे यांसह अन्य धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना शासनाने ‘सांस्कृतिक वारसा’ म्हणून घोषित करावे. तसेच प्राचीन मंदिरांचे पुनर्निर्माण करतांना धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन घ्यावे. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट या वेळी म्हणाले की, मंदिर समित्यांमध्ये होणारा भ्रष्टाचार, हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम आहे. हे रोखण्यासाठी मंदिर विश्‍वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी पुढे येऊन राष्ट्रीय स्तरावर अभियान राबवणे आवश्यक आहे. यावेळी श्री. घनवट यांनी ‘राममंदिराप्रमाणे काशी, मथुरा यांसह देशभरातील 40 हजार मंदिरे मुक्त करण्यासाठी हिंदूंनी ‘राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियाना’त सहभागी व्हावे’, असे आवाहनही केले. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले की, धर्मनिरपेक्ष म्हणवणारे शासन हिंदूंची मंदिरे कह्यात घेते; मात्र मशीद किंवा चर्च घेत नाही. मंदिरांतील धन अन्य धर्मियांसाठी खर्च केले जाते. शासनाकडून मिळणार्‍या दुजाभावाच्या विरोधात हिंदूंनी दबावगट निर्माण करायला हवा.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार