सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी यांचे मंदिरे भक्तांकडे देण्याच्या वचनाचे स्वागत !

भाजपने तामिळनाडूच नव्हे, तर देशभरातील सरकारीकरण केलेली मंदिरे मुक्त करावीत ! - हिंदु जनजागृती समिती*

Snehal Joshi . सौजन्य- हिंदु जनजागृती समिती,
  • Mar 13 2021 11:50PM

कर्नाटक राज्यातील चिक्कमंगळुरू मतदारसंघातील भाजपचे आमदार तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. सी.टी. रवी यांनी ‘तामिळनाडू राज्यात भाजपची सत्ता आल्यास सर्व मंदिरे भक्तांना परत करणार’ असल्याचे वचन दिले आहे. ‘मंदिरे मुक्त करा !’, या अभियानाला समर्थन दिले आहे. याविषयी त्यांनी ट्वीटही केले आहे.

आमदार सी.टी. रवी यांच्या वचनाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करत आहे. यापूर्वी कर्नाटक राज्यात भाजपची सत्ता आल्यास राज्यातील सर्व मंदिरे पुन्हा भक्तांच्या स्वाधीन करण्यात येतील, असे आश्‍वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी दिले होते. तसा निवडणूक जाहिरनामाही प्रसिद्ध करण्यात आला होता.

कर्नाटकात भाजपची सत्ता आल्यावर सर्वप्रथम गोरक्षणाचा कायदा संमत केला, त्याच प्रकारे आता कर्नाटकातील सर्व मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्याचा निर्णय घेऊन हिंदु भाविकांच्या श्रद्धांचा सन्मान करावा, असे आवाहन करत भाजपशासित अन्य राज्यांतही मंदिर सरकारीकरण रहित करून मंदिरे भक्तांच्या स्वाधीन करावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात विविध राज्यांतील हजारो मंदिरांचे सरकारीकरण करून मंदिरांतील देवनिधी लुटण्यात आला, हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्यात आला. मशिदी आणि चर्च यांना वगळून हिंदु मंदिरांचेच सरकारीकरण करण्यात आले. हा अन्याय दूर करण्याचा आरंभ भाजपाने करावा, असेही श्री. शिंदे यांनी म्हटले आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

3 Comments

बहुत अच्छा आश्वासन है।

  • Guest
  • Mar 14 2021 1:24:37:263AM

बहुत अच्छा आश्वासन है।

  • Guest
  • Mar 14 2021 1:24:18:310AM

बहुत अच्छा आश्वासन है।

  • Guest
  • Mar 14 2021 1:22:56:720AM

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार