सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रजासत्ताक दिनापर्यंत छत्रपती संभाजीनगर करा, नाहीतर…

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवगर्जना करीत १९८८ साली औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती

Sudarshan MH
  • Dec 23 2020 1:00PM
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवगर्जना करीत १९८८ साली औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती. आता या घटनेला ३२ वर्षे होत आहे,ही घोषणा प्रत्यक्षात यावी, ही समस्त छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांची इच्छा आहे. खुद्द मनसेप्रमुख हिंदुजननायक राज साहेब ठाकरे यांनीही संभाजीनगरसाठी मोहिम सुरु केलेली आहे. 

आजवर शिवसेनेने केवळ राजकीय फायद्यासाठी संभाजीनगरच्या नामकरणाला समोर केले आहे,कधी सत्ता नाही, तर कधी कोर्टकचेऱ्यात अडकलंय म्हणून औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर होत नाही. वेळेप्रसंगी विरोधकांवर खापर फोडून आपली भाकरी भाजून घेण्यात आजवर शिवसेनेने धन्यता मानलेली आहे. आता महानगरपालिका आणि राज्याच्या सत्तेच्या चाव्याही शिवसेनेकडे आहेत आणि खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत. आता शिवसेनेने आपला शब्द व राजकीय अस्तित्त्व राखण्यासाठी का होईना प्रजासत्ताकदिनापूर्वी औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करावे. 

अन्यथा इथून पुढे तुमच्या तोंडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करु नका. मनसेप्रमुख राज साहेब ठाकरे आणि मनसेसैनिक मनसे स्टाईलने औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करतील. त्याची चिंता शिवसेनेने करू नये, त्यासाठी मनसे खंबीर आहे,संभाजीनगरच्या रहिवाशांनी  औरंगाबाद आणि संभाजीनगरची खेळी ओळखलेली आहे. त्यामुळे येथून पुढे संभाजीनगरच्या नावाखाली मतांसाठी झोळी घेऊन जाणे बंद करा, त्याऐवजी शांतता आणि विकासाला प्राधान्य द्या. दोन ते तीन दशकांपासून सातत्याने सत्तेत असूनही अद्याप नागरिकांना स्वच्छ पाणी, रस्ते आणि पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. या सुविधा न देऊ शकल्याबद्दल शिवसेनेने नैतिक जबाबदारी स्वीकारून कुठल्याही निवडणूका न लढण्याची भूमिका घ्यावी...

सुहास दाशरथे
जिल्हा अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
संभाजीनगर

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार