सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
नंदुरबार: गेली आठ मास महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे देऊळ बंद होते.समस्त हिंदुत्ववादी संघटना यांनी सातत्याने मंदिर उघडण्यासाठी केलेली मागणी अखेर महाराष्ट्र शासनाने मान्य केली. आज दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडण्यात आली आहे, याचा आनंद साजरा करण्यासाठी देवाचा चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री मोठा मारुती मंदिर येथे हिंदु सेवा सहाय्य समितीचावतीने महाआरती करण्यात आली तसेच जागतिक कोरोना महामारी नष्ट होऊ दे, हिंदुराष्ट्राची स्थापना लवकर होऊ दे असे साकडे देवाला घातले. यावेळी भाविक भक्त यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून उपस्थित होते
महाआरतीला मोठा मारुती मंदिराचे अध्यक्ष अशोक चौधरी, सचिव कल्याण पाटील, विश्व हिंदू परिषदेचे अजय कासार, स्वदेशी बचाव आंदोलनाचे कपिल चौधरी, राष्ट्रीय स्वयं संघाचे भरत लोहार, हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत, सुमित परदेशी, जितेंद्र मराठे, हिंदुत्ववादी, भाविक यावेळी उपस्थित होते. महाआरती उपस्थित भाविक तसेच मोठा मारुती मंदिराचे पुजारी विलास महाराज यांचा शुभहस्ते झाली.