सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

युवकाची हत्या करुन , शव दुचाकीस बांधुन विहीरीत टाकले...

हिंगणा तालुक्यातील सुकळी गुपचूप शिवारात एका २४ वर्षीय युवकाची निर्घुण स्त्रिया करुन त्यांचे शव त्याच्याच दुचाकी ला बांधुन विहीरीत लोटण्याची घटना दि. ६ आक्टोंबरच्या सायंकाळी घडली

Snehal Joshi .
  • Oct 7 2020 8:13PM
हिंगणा तालुक्यातील सुकळी गुपचूप शिवारात एका २४ वर्षीय युवकाची निर्घुण स्त्रिया करुन त्यांचे शव त्याच्याच दुचाकी ला बांधुन विहीरीत लोटण्याची घटना दि. ६ आक्टोंबरच्या सायंकाळी घडली.आज पहाटे विहिरीतून मृतदेह व मोपेड बाहेर काढण्यात आली. प्राप्त माहितीनुसार , मृतकाचे नाव बंटी शामराव चिडाम..वय २४ वर्षे , रा. सुकळी गुपचूप असे आहे. फिर्यादी मेघराज चिडाम हा मृतकाचा चुलत भाऊ आहे. दुपारी मृतकाची भेट मेघराज यांच्या सोबत झाली. त्यानंतर तो दिसला नाही . परिसरात त्याची शोधाशोध करण्यात आली . मात्र तो कुठेच मिळाला नाही. रात्री २२ वाजता घटनेची तक्रार हिंगणा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. मृतकाच्या घरच्या लोकांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध सुरू केला.आज( ७) पहाटे याच गावापासून काही अंतरावर शेतातील विहिरीजवळ त्यांना एका खांबाला रक्ताचे डाग दिसून आले तेथून विहिरीकडे कुणाला तरी ओढत नेल्याच्या खुणा जमिनीवर होत्या .त्यामुळे विहिरीत गळ टाकण्यात आला सकाळी ८ वाजता बंटीचे प्रेत व मोपेड गाडी विहीरीतुन बाहेर काढण्यात आली. पोलीसांनी फिर्यादी च्या सांगण्यावरून मृतक बंटी हा त्याच्या बहिणीला गावातील एक तरुण त्रास देत होता.त्या तरुणाला समज द्यायला गेला होता त्यावरून पोलिसांनी एका संशयित आरोपीला आज सायंकाळी ताब्यात घेतले असून समजवायला गेलेल्या भावावरच आरोपीने हल्ला करून खून तर केला नाही?याची चौकशी सुरू आहे, त्याच्या विरोधात अपराध क्रमांक ५९३ भादवि ३०२ , २३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. सरिन दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद रघुवंशी,पी. एस.आय. विनोद नरवाडे करत आहेत

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार