३ ते ६ ऑगस्ट दरम्यान राज्यातील बऱ्याच भागांत चांगल्या पावसाचा अंदाज*
मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणात जोरदार स्वरूपाच्या अंदाज
४ ते ५ दरम्यान नागपूरसह विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागांत चांगल्या पावसाचा अंदाज असल्याचे मत देखील व्यक्त करण्यात आले आहे.
आगामी आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे आणि त्याच्या प्रभावामुळे ३ ते ६ ऑगस्ट दरम्यान राज्यातील बऱ्याच भागांत चांगला पाऊस पडण्याचा अंदाज इंग्लंडमधील रेडींग विद्यापीठातील हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी व्यक्त केला आहे. या दरम्यान कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील प्रामुख्याने किनार पट्टीतल्या भागांत मुसळधार पाऊस पडेल. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात ३ ते ५ दरम्यान (प्रामुख्याने ३ ते ४ दरम्यान) जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. पावसामुळे राज्यातील पश्चिम भागांत असलेल्या डोंगर भागांत दरड कोसळण्याची घटना देखील नाकारता येणार नाही.
४ ते ५ दरम्यान नागपूरसह विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागांत चांगल्या पावसाचा अंदाज असल्याचे मत देखील व्यक्त करण्यात आले आहे. याच बरोबर दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक विभागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे आणि आभाळी वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमान या दरम्यान कमी होतील.
मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकण किनारपट्टीत जोरदार पावसामुळे समस्या निर्माण होतील आणि यापासून लोकांनी सावध राहावे, असे आव्हान करण्यात आले आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प