सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हर्षित अरमरकर भारतीय लष्करात लेफ्टनंटपदी

अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या भारतीय लष्कर सेवेत नागपूरच्या हर्षित अरमरकरची लेफ्टनंट म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. हर्षतची ही लष्कराच्या सेवेत पहिलीची नियुक्ती आहे.

Snehal Joshi .
  • Dec 27 2020 8:54PM
अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या भारतीय लष्कर सेवेत नागपूरच्या हर्षित अरमरकरची लेफ्टनंट म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. हर्षतची ही लष्कराच्या सेवेत पहिलीची नियुक्ती आहे.
कुशाग्र बुध्दिमत्तेचे विद्यार्थीच प्रथमत: लेफ्टनंट या पदावर नियुक्त होतात असे म्हटले जाते. नुकत्याच डेहराडून येथे झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये एका शानदार कार्यक्रमात हर्षदला नियुक्तीचा बॅच बहाल करण्यात आला. लष्कराच्या नियमानुसार या समारंभाला प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात येत असते. हर्षितच्या या नियुक्तीप्रसंगी त्याचे वडील राजेश अरमरकर आई सौ. प्रतीक्षा आणि बहीण अदिती उपस्थित होते.
हर्षितने आरआयएमसी मिल्ट्री कॉलेज डेहराडून येथे 5 वर्षे प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून खडकवासला येथे नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडेमी येथे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर इंडियन मिल्ट्री अ‍ॅकेडेमी येथे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले.
या नियुक्तीमुळे हर्षितला अधिकारी दर्जा बहाल झाला. या नियुक्तीनंतर  मद्रास रेजिमेन्टमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. हर्षितची आई सौ. प्रतीक्षा अरमरकर यांच्या प्रोत्साहनाने आणि प्रयत्नांतून त्याने या सेवेत प्रवेश केला. आईचे त्याला सतत मार्गदर्शन मिळाले असल्यामुळेच आपल्या यशाचे श्रेय तो आई सौ. प्रतीक्षा यांना देतो. वडील राजेश अरमरकर हे एक प्रतिष्ठित यशस्वी व्यवसायी आहेत. ते प्रसिध्द सफायर ब्रांड एक्झिक्युटिव्ह खुर्च्यांचे निर्माता आहेत. हर्षितच्या या नियुक्तीमुळे त्यांच्या मित्र परिवारांनी व नातेवाईकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार