शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथे महाराष्ट्र शासनाच्या ई पीक पाहणी कार्यक्रमाअंतर्गत दोंडाईचा अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांच्या मार्गदर्शनाने टाकरखेडा शिवारातील या सर्व शेतकरी बांधवांना ही पाहणी ॲप बद्दल दिनांक 20 ऑगस्ट शुक्रवार रोजी मार्गदर्शन करण्यात आले.
सदर ई पीक पाहणी ॲप हे खातेदार अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून त्यानंतर प्राथमिक माहिती भरून अतिशय साध्या पद्धतीने शेतकरी बांधव आपली पीक पाहणी स्वतच नोंदवू शकतो असे मार्गदर्शन तलाठी महेश गायकवाड यांनी यावेळी केले यावेळी गावातील सर्व शेतकरी वर्ग उपस्थित होते.
दोंडाईचा मंडळ अधिकारी एम शास्त्री यांच्या प्रयत्नातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनीही शेतकऱ्यांना हे ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333