सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लातूरमध्ये सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांसाठी मार्गदर्शन

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या लातूर शाखेच्या वतीने सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

s.ranjankar
  • Aug 24 2021 5:33PM
 
 
लातूर:द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या लातूर शाखेच्या वतीने सूक्ष्म,लघु व  मध्यम उद्योगांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य तथा एमएसएमई समितीचे अध्यक्ष सीए धीरजकुमार खंडेलवाल यांची उपस्थिती लाभणार आहे.आयसीएआय ठाणे शाखेचे अध्यक्ष सीए एस.बी. असावा हे देखील प्रोजेक्ट फायनान्स फॉर एमएसएमई या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.   बुधवार दि.२५ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता द इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या दयाराम रोड शाखा कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमानंतर लातूर जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी व व्यापारी प्रतिनिधींसोबत उद्योगांशी निगडित सबसिडी, व सबसिडीचे लाभ घेण्यात येणाऱ्या अडचणी या विषयावर संवाद साधला जाणार आहे.
   लातूर शहर व परिसरातील सर्व सीएंनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित रहावे,असे आवाहन द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियाच्या लातूर शाखेचे अध्यक्ष सीए विशाल चव्हाण,उपाध्यक्ष द्वारकादास भुतडा,सचिव विनोद साळुंके,राजेश अग्रवाल,किशोर भराडिया यांनी केले आहे.
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार