सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सोने खरेदीची सुवर्णसंधी

दोन ते तीन महिन्यांआधी सोनं 56000 प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचलं होतं. पण आता हा आकडा घसरत 52000 प्रति 10 ग्रामपर्यंत आला आहे.

Snehal Joshi .
  • Oct 4 2020 11:29AM
कोरोना संकटामुळे देशात सोन्या-चांदीच्या भावातही चढ-उतार दिसत होता. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. कोरोनाच्या संकटात तर सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले. पण आता सोन्याच्या भावात पुन्हा एकदा घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.दोन ते तीन महिन्यांआधी सोनं 56000 प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचलं होतं. पण आता हा आकडा घसरत 52000 प्रति 10 ग्रामपर्यंत आला आहे.गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या अनेक घटनांचा थेट परिणाम सराफा बाजारावर झाला होता. अशात आता भारतात धनत्रोयदशी आणि दिवाळी असे मोठे सण येत आहेत. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वधारण्याची शक्यता आहे.तज्ज्ञांच्या मते, पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत 60 ते 65 हजार प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचेल असं बोललं जात आहे.यामुळे आताच सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य संधी आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतरही सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली होती. आगामी सणांमुळे ही किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.    

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार