सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सोने,चांदी दरात मोठी घसरण, घसरण पुढेही कायम

आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विक्रमी नोंद असलेल्या सोने दरात मोठी घसरण झाली आहे.

Snehal Joshi .
  • Aug 13 2020 11:28AM
आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विक्रमी नोंद असलेल्या सोने दरात मोठी घसरण झाली आहे. कोरोना विषाणूचे संकट असताना लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे अनेक उद्योगधंदे अडचणीत आलेत. तर काही सुरु झाले तरी अनेक बंद अवस्थेत आहेत. सध्या अर्थव्यवस्थेत मंदी दिसून येत आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मात्र, आज सोने (Gold) आणि चांदीच्या  (Silver) दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोने दर ५८ हजारांच्या घरात पोहोचला होता. मात्र, सातत्याने वाढ होणाऱ्या सोने दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच चांदीच्या किलोच्या दरातही अनपेक्षित मोठी घट झाली आहे. दरम्यान, दिल्लीतही मोठी घसरण दिसून येत आहे. गेल्या चार दिवसांत ६००० रुपयांची घसरण झाली आहे. आज पुन्हा सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. आज दिल्लीच्या स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमती १५०० रुपयांनी खाली आल्या. काही दिवसांपूर्वी सोन्याची किंमत ५६ हजार रुपयांवर पोहोचली होती, पण आजच्या घसरणीनंतर पुन्हा ते प्रति १० ग्रॅम ५० हजारांची खाली आली आहे. काल सोने दरात ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. आजही अडीच टक्के सोने खाली आले आहे. आज चांदी देखील प्रतिकिलो चार हजार रुपयांच्या घसरणीसह बाजाराला सुरुवात झाली. चांदी ६३ हजार रुपये प्रति किलोच्या खाली किंमत आली आहे. याआधी चांदीचा दर ७६ हजार रुपये किलोचा भाव होता. हा विक्रमी दर होता. मंगळवारी चांदी १२ टक्क्यांनी घसरली. लॉकडाऊनमध्ये मंदीच्या काळात सराफा बाजारात तेजी असल्याचे दिसून आले आहे. सातत्याने सराफा बाजारात तेजीत वाढ होत असताना आज अचनाक घसरण पाहायला मिळाली. आज सोन्याचांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत असून सोने भावात प्रतितोळे ५ हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या भाव प्रतितोळे ५८ हजार वरुन घसरत ५३ हजार ५०० वर गेले आहेत तर चांदीच्या भावात प्रतिकिलो १४ हजार रुपयांची घसरण झाली आहे.  चांदीचे भाव ७८ हजार रुपये किलो वरुन झाली ६४  हजार रुपये किलोपर्यंत घाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारात घसरण झाल्याने सोने आणि चांदी दरात मोठी घसरणा झाल्याची माहिती जळगावातील सोने व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले असल्याने सोने-चांदीच्या भावात प्रचंड वाढ झाली होती. परंतु आता सोन्याचांदीची विक्री सुरु झाल्याने सोने-चांदीच्या भावात प्रचंड तूट झाली आहे. ही तूट पुढे देखील सुरु राहणार आहे, अशी माहिती सोने व्यापाऱ्यांनी दिली आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार