ग्लेनमार्क फार्मासिटिकल ने आणला कोरोनावर औषध.*
फेविपिरवीर चे उत्पादन आणि विक्री करण्याची परवानगी हिंदुस्थान औषध महान नियंत्रकाने ग्लेनमार्क फार्मा ला दिली आहे. त्यामुळे लवकरच हे औषध बाजारात उपलब्ध होणार आहे.
कोरोनाचे लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी ग्लेनमार्क फार्मासिटिकल ने औषध आणले आहे. या अँटी व्हायरल फॅबीफल्यु
(फेविपिरावीर) असे हे टॅबलेट आहे. या गोळीची किंमत 103 रुपये आहे. दरम्यान करोना रुग्णांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
ग्लेनमार्क फार्मा ही औषध निर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. मागील सहा महिन्यांपासून जगभरात कोरोना व्हायरस वर लस तयार करण्यासाठी संशोधन सुरू आहे. मात्र अद्याप कुणालाही यात यश मिळाले नव्हते. पण ग्लेनमार्क फार्मा ने करोनाचे सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांसाठी औषध आणले आहे.एक गोळी 103 रुपयांना आहे. 34 गोळ्यांची स्ट्रिप असून त्याची किंमत 3,500/- रुपये इतकी आहे.
फेविपिरवीर औषध कोरोना बाधित यांसाठी परिणामकारक ठरेल असा दावा ग्लेनमार्क फार्मा ने केला आहे. फेविपिरवीर चे उत्पादन आणि विक्री करण्याची परवानगी हिंदुस्थान औषध महान नियंत्रकाने ग्लेनमार्क फार्मा ला दिली आहे. त्यामुळे लवकरच हे औषध बाजारात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे कोरोना रोखण्यासाठी पहिल्यांदाच एखाद्या औषधाला सरकारने मान्यता दिली आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प