सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुदखेड नगरपरिषदेवर पुन्हा भाजपाचे कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनो सज्ज व्हा: खा.चिखलीकर

कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनो सज्ज व्हा: खा.चिखलीकर

Sudarshan MH
  • Nov 18 2020 8:06AM
 
 
मुदखेड दि.१८(अरविंद जाधव) शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेवर भाजपाचे झेंडा फडकावा मी स्वतः वैयक्तिक लक्ष्य देऊन गेल्या पंचविस वर्षापासून रखडलेली अनेक विकास कामे मी पाच वर्षात पूर्ण करु दाखवणार असे प्रतिपादन खा.प्रताप पा. चिखलीकर यांनी मुदखेड मोंढा येथे आयोजित दिवाळी आनंदोत्सव व साखरतुला कार्यक्रमात बोलताना केले आहे.
 
मुदखेड मोंढा येथे दि.१७ नोव्हेंबर मंगळवार रोजी दिवाळी निमित्ताने तालुका आणि शहर भाजपाच्या वतीने आयोजित दिवाळी पान सुपारी आणि खा.प्रतापराव पा.चिखलीकर व माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांची साखरतुला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर,जिल्हा सरचिटणीस श्रावण पा.भिलवंडे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अॅन्ड किशोर देशमुख,भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर,तालुकाध्यक्ष शंकर मुतकलवाड,शहराध्यक्ष पुरूषोत्तम (मुन्ना) चांडक,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष देवा पा.धबडगे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना खा.प्रताप पा.चिखलीकर म्हणाले की,बिहार मधील निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील बऱ्याच मंत्र्याच्या मनात धडकी भरली असून आता आपले पद किती दिवसासाठी आहे,हे समजले असावेत,काही महाविकास आघाडीतील सत्ताधारी नेते मंत्रीपदाचे दिवस मोजत असावेत असे म्हणत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे नाव न घेता त्यांना अप्रत्यक्ष टोला अप्रत्यक्ष लगावला. तसेच देशभरातील वातावरण दिवसेंदिवस भाजपमय होत असून बदलत्या वातावरणा नुसार मुदखेड येथील,शेतकरी,व्यापारी,मजूर युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होऊन आगामी काळात मुदखेड पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवा असे संबोधित मनोगत करताना खासदार चिखलीकर व्यक्त केले.भाजपा जो शब्द देतो तो पाळतो, आम्ही बिहारमध्ये नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता,तो आम्ही पाळला.जेडीयुच्या कितीही जागा आल्या तरी मुख्यमंत्री पदावर नितीशकुमार राहणार असा शब्द भाजपाने दिला होता.यामुळे आता बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार असे सांगितले. कधीकाळी महाराष्ट्रात जी मंडळी सोबत होती आम्हाला सोडून गेलेत अन मुळ हिंदूत्वाची विचाराधारा विसरले आहेत असे दिसून येत आहे.त्यांची अवस्था कशी झालेली आहे ते तुम्ही पाहत आहात असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर ही टीका केली.तसेच कोरोनाच्या काळात महाविकास अाघाडीच्या सरकारने मुंबईमध्ये डान्स बार सुरू केली परंतु राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु केली नाहीत,यामुळे संपूर्ण राज्यभरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाव- तालुका स्तरावर आंदोलन केल्यानंतर सरकारला जाग आली असून आता प्रार्थनास्थळ सर्वासाठी खुली केली आहेत हे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे यश असल्याचे सांगितले.
 
राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर कडाडून टीका करत मराठा आरक्षण,पिक विमा,मुदखेड सराफा व्यापाऱ्यांवर दरोडा आदी प्रकरणाचा उल्लेख केला. काही दिवसापुर्वी मुदखेड येथील व्यापाऱ्यांवर दरोडेखोराकडून झालेला हल्ला दुर्दैवी असून काही व्यापारी मंडळी माझ्याकडे आल्यानंतर मि त्यांना एक लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस प्रशासनातील महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक नांदेड यांना बोलल्यानंतर सदरील दरोडा प्रकरणाची सखोल चौकशी झाली.भाजपाच्या भुमिकेमुळे कधी नव्हे तो मुदखेडात चोरीचा तपास लागला अन पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले असा उल्लेख केला.जिल्हासह मुदखेडात मटका,गुटखा,अवैधधंदे कोण चालवतात,हे लोकांना माहिती अाहे,परंतु प्रत्यक्षात रुप एक दाखवायच अन त्यांना प्रोत्साहन द्यायच हे दुतर्फी भुमिका कशी करतात हे लोकांना सांगायची गरज नाही असे म्हणत त्यांनी कांग्रेस नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली.
 
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष शंकर मुतकलवाड,शहराध्यक्ष मुन्ना चांडक,माजी जि.प.सदस्य गणेशराव पा.शिंदे,माजी सभापती प्रल्हाद हट्टकर,किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष हनमंतराव देशमुख,सरचिटणिस अशोक पा.पवार,संजय पा.पवार,माधव पा.गाढे,गजानन कमळे,अमोल अडकिने,कालिदास जंगीलवाड,प्रकाश पा.सुर्यवंशी,उत्तम अप्पा चिद्रावार, प्रवीण अप्पा चिद्रावार,खंडोराव चिद्रावार,मुकेश मामीडवार,ज्ञानेश्वर पा.पवार,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष देवा पा.धबडगे, महिला मोर्चाच्या जयाताई देशमुख, किर्ती देशमुख,दिला गोडसे,वर्षाताई चंद्रे,सुधामराव खानसोळे,गोंविद गोपन्नपल्ले,माधव पा.पुयड भगवान पा.नागेलीकर आदिसह व्यापारी ,शेतकरी,शेतमजूर, हमाल मापाडी अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार