सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*ओल्या कचऱ्यातून खत निर्मिती, ग्रामायण प्रतिष्ठान आयोजित कार्यशाळा*

आपल्या घरी रोज चिरल्या जाणाऱ्या भाज्या, फळे यांच्या निघणारी साली, मुळे, दांड्या असा हिरवा कचरा रोजच निघत असतो. या हिरव्या कचऱ्याचे नियोजन आपण आपल्या घरीच सहजपणे करू शकतो. ग्रामायण प्रतिष्ठान द्वारे आयोजित चौथ्या ज्ञान सत्रात आपल्या घरातील हिरव्या कचऱ्याचे खतात रूपांतर कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Snehal Joshi
  • Jul 2 2020 12:02AM
शुद्ध पर्यावरणासाठी कचरा नियोजन ही काळाची गरज आहे. प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याची वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असते. आपल्या घरी रोज चिरल्या जाणाऱ्या भाज्या, फळे यांच्या निघणारी साली, मुळे, दांड्या असा हिरवा कचरा रोजच निघत असतो. या हिरव्या कचऱ्याचे नियोजन आपण आपल्या घरीच सहजपणे करू शकतो. ग्रामायण प्रतिष्ठान द्वारे आयोजित चौथ्या ज्ञान सत्रात आपल्या घरातील हिरव्या कचऱ्याचे खतात रूपांतर कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रविवार, दि. ५ जुलै २०२० वेळ दुपारी ४ वाजता विषय - घरच्या ओल्या कचऱ्यातून खत निर्मिती मार्गदर्शक- सौ. मीनाताई जोशी. मीनाताई 2008 मध्ये कल्याण मूक बधिर विद्यालय, नागपूर येथून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. मीनाताईंना बागकामाची विशेष आवड. सारखीच आवड असणारी काही मित्रमंडळी एकत्र येऊन एक ग्रुप तयार केला त्याचे नाव 'सदाफुली'. बागकाम आणि खतनिर्मिती हा त्यांचा विषय. फेसबुक लाईव्ह होणाऱ्या या कार्यशाळेत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मीनाताई देतील. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ग्रामायण प्रतिष्ठानचे पेज लाईक करावे. त्यासाठी या लिंक वर जावे. 9665054508 स्वत: चे नाव व गाव सह सोबतच्या नंबर वर WhatsApp मेसेज करा आणि लिंक प्राप्त करा. या ज्ञान सत्रात सहभागी होऊन निर्मितीचा आनंद घेत पर्यावरणप्रेमी नागरिक बनू या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार