सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ग्रामायणची तिसरी कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न

एकूण चार सत्रे झाली. पहिल्या सत्रात श्री विवेक देवराई यांनी गाय, गोमूत्र आणि गोमय यांच्या संदर्भात जगभर झालेला संशोधनाच्या आढावा घेऊन माहिती दिली.

Snehal Joshi .
  • Feb 23 2021 7:13PM

ग्रामायण प्रतिष्ठान ची तिसरी कौशल विकास कार्यशाळा नेत्र बंद प्रकल्प निसर्ग विज्ञान संस्था येथे काल पार पडली. दिवसभर प्रशिक्षणार्थींनी गोमया पासून तयार होणारे विविध पदार्थ आणि वस्तु कशा करायच्या त्या समजून घेतल्या आणि स्वतःच्या हाताने प्रत्यक्ष करून पण पाहिल्या. यामध्ये दंतमंजन , उटणे, साच्यातून विविध मूर्ती, चित्र आदि वस्तू बनविणे, तसेच मशिनच्या साह्याने गोमय काष्ट कसे बनवावे ? कुंड्या कशा तयार कराव्या ? याचे विधिवत दिवसभर प्रशिक्षण घेतले.

एकूण चार सत्रे झाली. पहिल्या सत्रात श्री विवेक देवराई यांनी गाय, गोमूत्र आणि गोमय यांच्या संदर्भात जगभर झालेला संशोधनाच्या आढावा घेऊन माहिती दिली. दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात देवलापार येथील श्री प्रमोद मिश्रा यांनी सर्व प्रत्यक्ष वस्तू करून दाखविल्या.

नंतरच्या सत्रात श्री दीपक साहू आणि स्थानिक कारागीर महिला यांनी साच्याच्या वस्तू कशा बनवायच्या ते सर्वांना शिकविले. समारोपा पर्यंत सर्वांची शिकणे सुरू होते .आम्ही त्या उद्देशाने आलो ते उद्देश तो उद्देश सफल झाला आहे आणि आता आम्हाला असं प्रशिक्षण इतरांनी पण घ्यावं ,यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं प्रशिक्षणार्थी म्हणाले . बेझलवार मॅडम या म्हणाल्या की, मला भटक्या-विमुक्त समाजासाठी तुमच्या सहकार्याने असं प्रशिक्षण शिबिर आयोजित करायचे आहे. पुणे सेवासदन संस्थेने तीन शिक्षक यासाठी मुद्दाम पाठवले होते आणि प्रशिक्षण घेऊन सेवा सदन च्या विद्यार्थ्यांना असं प्रशिक्षण त्यांनी द्यावं ,असा संस्थेचा मानस आहे, असे श्री अजय चव्हाण यांनी सांगितले.

समारोप सत्रात सर्वांना सहभाग प्रमाणपत्र ग्रामायण चे अध्यक्ष श्री अनिल सांबरे आणि निसर्ग विज्ञान संस्थेचे अध्यक्ष श्री विजय घुगे यांच्या हस्ते देण्यात आले. श्री किशोर केळापुरे आणि दीपक साहू यांनी व्यवस्था सांभाळली. ग्रामायण तर्फे दर महिन्याला अशा एका गोमय कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. पुढील शिबीर 21 मार्चला होणार आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार