सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गजानन गोपेवाड सर यांना राज्य स्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा तालुका महागाव

Sudarshan MH
  • Mar 16 2021 8:27PM
 
यवतमाळ- *प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001*
 
जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ याशाळेतील *उपक्रमशील पदवीधर शिक्षक गजानन गोपेवाड सर* यांना11/4/2021चा माऊली संकुल, झोपडी कँटिन, नगर मनमाड रोड सावेडी अहमदनगर, सभागृहात येथील भव्य दिव्य समारंभात सन 2021चा लोकसत्ता संघर्ष अहमदनगर, येथील प्रतिष्ठेचा, शिक्षक रत्न राज्य पुरस्कार देण्यात येणार आहे, गजानन गोपेवाड यांनी नवपक्रमशील शिक्षक म्हणून यवतमाळ जिल्ह्यात नावलौकिक आले आहे, त्यांनी मुडाणा शाळेत अग्निपंख विज्ञान केंद्र उभारुण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रयोग करत आहे. या उपक्रमाचा प्रचार व प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडिया च्या माध्यमातून करत आहे, याचा फायदा अनेक शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना होत आहे. याच बरोबर सामाजिक उपक्रम, राष्ट्रीय उपक्रमात सहभागी झाले असून त्यांनी अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले. देशहितासाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले गेले आहे. या पुर्वी पण गजानन गोपेवाड यांना महाराष्ट्रात अनेक मानसन्मान व प्रतिष्ठेचा समजला जाणारे अनेक संस्थानी राज्य स्तरीय गुण गौरव, उपक्रमशील राज्य पुरस्कार, महाराष्ट्र रत्न, मानव विकास, कडुन गुण गौरव पुरस्कार मिळाला, 
 
*गजानन गोपेवाड सर यांचे काही उल्लेखनीय शैक्षणिक कार्य* 
1) राज्यव्यापी प्राथमिक भरीव प्रशिक्षण 2004 ला व 2005 ला सन्मान पत्र
2) आशय गणित समृद्धी कार्यक्रमात सहभागी व सन्मान पत्र सन 2008
3) मानव विकास अधिकार सुरक्षा उमरखेड परिषदेत सत्कार व सन्मान पत्र सन 2009
4) राष्ट्रीय जनगणना कार्यक्रम दिनांक 30/11/2010 या मध्ये राष्ट्रीय कार्य केले, 
5) मानव अधिकार सुरक्षा परिषद मुंबई ,यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले बदल सन 2010 ला राज्य स्तरीय गुण गौरव पुरस्कार प्रदान केला 
6) जिल्हा स्तरावरील कब पथक व तालुका पातळीवर कब पथक सहभागी व तालुका पातळीवर सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक सन -2016,2017,2018
7) अग्निपंख विज्ञान केंद्राची स्थापना दिनांक 16 डिसेंबर 2017 ला करून, गणित, विज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यात येत आहे, विद्यार्थी मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी छोटे छोटे प्रयोग यशस्वी चाचणी घेऊन करत आहे, अखंड व अविरत पणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना गणित विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी म्हणून, आणि आज रोजी 365 शैक्षणिक व्हिडिओ गणित विज्ञान विषयातील बनवून संपूर्ण महाराष्ट्रात, व जागतिक पातळीवर युट्यूब, फेसबुक, ब्लॉग च्या माध्यमातून व काहि सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून प्रसार व प्रचार सुरु आहे, यात विशेष प्रेरणास्थान मा, मिलींद कुबडे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ ,आमचे मार्गदर्शक सर्व चमु आहे, विशेष आभार मा, नितीन भालचक्र (अधिव्याख्याता) 
8) 2आँक्टोंबर 2019 ला सलाम फाउंडेशन मुंबई याचे मार्फत सन 2019 चा व्यसनमुक्ती साठी महाराष्ट्र रत्न गुण गौरव सन्मान मिळाला. 
9) 45 वे तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शनात उपाध्यक्ष पद भूषविले. 
10) नवौपक्रमशील शिक्षक राज्य पुरस्कार सन 1 नोव्हेंबर 2019 ला मिळाला. 
11) पुरग्रस्तांना आर्थिक मदत व लोकसहभागातून उभी करून दिली सन 2019
12) संकल्प सिध्दी संस्था भंडारा कडुन करोना -19 च्या काळात उल्लेखनीय कामगिरी बदल सन्मान पत्र मिळाले 
13) कोरोना -19 योद्धा म्हणून सलग 28 दिवस काम साधुनगर येथे केले त्या बदल तहसीलदार महागांव यांच्या कडून गुण गौरव सन्मान पत्र मिळाले .
14) शिक्षणाची वारी मध्ये विद्यार्थी सह सक्रीय सहभाग घेतला नांदेड येथील, सन 2019
15) भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी 2019 ला सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आले. 
16) तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात व जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात चिल्ड्रन्स इनोव्हेशन व कार्यशाळा घेतली सन 2019_2020
17) 5 सप्टेंबर 2020 ला शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यातील सन्मान पत्र मिळाले. 
18) पत्रकार दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकारीतेकरता वार्ताहर, प्रींट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचा जाहीर सत्कार सलग घेतला जात आहे. सन 2017,ते 2021 
19) 27 जुलै 2020 ला संपूर्ण महाराष्ट्रात भारतरत्न डॉ, ए पी जे कलाम सरांच्या 50 व्या स्मृतिदिन आँनलाईन प्रश्न मंजुषा घेऊन सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले. सन 2020
20) 5 सप्टेंबर 2020 ला सहित्य संपदा या संस्थेने सन्मानीत केले. 
21) 5सप्टेंबर 2020 ला MKCL आँनलाईन स्पर्धेत सहभागी झाले त्या बद्दल सन्मान पत्र दिले. 
22) कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आँनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेत सहभागी झाले म्हणून सन्मान पत्र दिले. सन 2020
23) मेरी शिक्षा,मेरा अभियान भारत, 1/10/2020 ला my NEP, AMBASSADOR राष्ट्रीय शिक्षा पाँलीसी 2020
24) राष्ट्रीय शिक्षक शास्त्रज्ञ भारत 1जानेवारी 2021 ला सहभागी व सन्मान पत्र दिले.
25) हरित सेना 350 विद्यार्थी सह केले 
26) राष्ट्रीय वन्यजीव संरक्षण वन विभागाच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येते. 
27) वृक्षारोपण व संवर्धन,जलसाक्षरता,वसुंधरा दिन, साजरा केला जात आहे. वनराई बंधारे दरवर्षी बांधले जातात, सामाजिक, उपक्रम राबविले जात आहे. 
28) राज्य पातळीवर , जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, विज्ञान /गणित विषयाचा तज्ञ शिक्षक म्हणून काम सुरू आहे .कार्यशाळा घेतली जात. 
29)थोर पुरषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त शाळेत व महाराष्ट्र अग्निपंख समुहा मार्फत उपक्रम घेतले जात आहे. 
30) तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणपत्र दिले जात आहे.
याच बरोबर प्रींट मीडाया , इलेक्ट्रॉनिक मीडिया साठी सामाजिक, राष्ट्रीय, शैक्षणिक ,कविता, स्त्री सबलीकरण, सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जात आहे, लेख लिहून प्रसिद्धी देण्यात येते.माझ्या उपक्रमाची दखल प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी घेऊन प्रसिद्धी दिली. 
31) याच बरोबर खेळ क्रीडा, योगासन, मात काम, कलाकुसर, खेळणी, इलेक्ट्रॉनिक व कागदी बनवून घेतली जात, भारतीय सण, उत्सव साजरे केले जातात. अग्निपंख शैक्षणिक समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तळागाळातील शिक्षक, पालक विद्यार्थी जवळपास 36000 लोकांनी माझे उपक्रम बघीतले .1000 माझ्या युट्यूब चॅनेल चे शिक्षक ,पालक, विद्यार्थी सभासद आहे. फेसबुकवर 5000+व गृपमध्ये पण बरेच शिक्षक पालक विद्यार्थी उपक्रम बघतात,
 
गजानन गोपेवाड सर यांनी या यशाचे श्रेय विद्यार्थी व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ मधील मा. नितीन भालचक्र (अधिव्याख्याता) मार्गदर्शक यांना दिले आहे.
गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व महागांव, ऊमरखेड, पुसद येथील शिक्षकांनी गजानन गोपेवाड यांचे कौतुक केले आहे .अग्निपंख फाउंडेशन उमरखेड चे पदाधिकारी आत्माराम माटाळकर, राजकुमार कोंडलवाडे, साहेबराव भांगे, अशोक लांडगे,यांनी पण सुभेच्छा दिले आहे, सर्वच स्तरावर शुभेच्छांचा त्यांच्यावर वर्षाव होत आहे,

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार