नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खुमारी टोल नाक्यावर दि. 09/02/2021 रोजी पोलिस स्टेशन रामटेक यांनी गुप्त मिळालेल्या माहितीनुसार खुमारी टोल नाका येथे जाऊन सदर नाका बंदी केली असता एक कंटेनर क्र. HR. 55,T 1214 मिळाला त्यामध्ये 60 गोवंश मिळुन आले. सदर जनावरे व गाडी ची किंमत असा एकुण मुद्देमाल 14,80,000/ रुपये आहे.पोलिसांनी आरोपी साऊद उस्मान खान वय 31 वर्ष रा. सोनिया गांधी कॉलनी एशबाग स्टेडियम भोपाल, आसम पप्पीरिआज बक्ष वय 31 रा. बाफरद ताब्झ घरं नं 1130 गल्ली नं 2 भोपाल, अझरुद्दीन वहिदा खान वय 26 भोरास ता.बेरशिया जी.भोपाल, आबिद कमरअली खान वय18 रा.सिरोंच नटरेन विदिशा म.प्र. यांना पकडले असून कलम 11(1)(अ)(ड)(ई)(फ) प्राण्याचा छळ प्रतिबंद कायदा सहकलम 5(1)(2),9 महाराष्ट्र प्राणी सुधारणा आदिनीयम कलम 429 भा. दा.वि सहकलम 119 मु .पो.का गुन्हा दाखल केला असून हि कारवाही पोलीस अधीक्षक राकेश ओला,पोलीस उपविभागीय अधिकरी नयन आलूरकर यांच्या मार्गदर्शनात रामटेक चे ठाणेदार प्रमोद मकेशवर,ए पी आय शेंडगे,पी एस आय राऊत गोविंद खांडेकर,आकाश शिरसाट,राजू पोले,अतुल बांते,शेंद्रे यांनी केली