मुंबई: भारतीय वायूसेनेच्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने १७ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघात २६७ निवडणूक अधिकार्यांना उतरवण्यात आले. या वेळी मतदान यंत्रेही उतरवण्यात आली. १९ एप्रिल या दिवशी गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.
गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. हा मतदारसंघ अतीसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. यामध्ये मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या तालुक्यांचा समावेश आहे.