सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो

8 मार्च महिला दिवस

Sudarshan MH
  • Mar 8 2021 6:56AM
 
 
 
 
 
*प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001*
 
   एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत, स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री, असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता. म्हणूनच, समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार, तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या. मात्र, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर, आपल्यावर होणारा अन्याय, आपले हक्क याबाबत स्त्रियांमधे सजगता येऊ लागली. त्यातूनच स्त्रीवादाचा जन्म झाला. स्त्रीवाद किंवा फेमेनिझम हा मूळ फ्रेंच शब्द. तो जेव्हा पहिल्यांदा वापरला गेला, तेव्हा त्याची सर्वत्र टर उडवली गेली. आणि कमाल म्ह्णजे राणी व्हिक्टोरियाही या चेष्टेत सामील होती, तिने स्त्रीवाद म्हणजे मूर्खता, पाप आणि महाचूक अशी त्याची संभावना केली.
 
      मुळात, नोकरीसाठी स्वेच्छेने अथवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी असलेली लिंगविषमता खटकू लागली. पुरुषांइतकेच काम करूनही वेतनात समानता नव्हती किंवा समान संधीही उपलब्ध नव्हत्या. आणि मग आपल्या हक्कांबाबत स्त्रिया जागृत होऊ लागल्या. स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्यांनी केले त्यातल्या काही स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण सदैव कृतज्ञ असणे आवश्यक आहे.
जागतिक महिला दिन 
पुर्वी पासुनच भारतीय संस्कृतीत स्त्रीला फार महत्त्व दिले जात असे. एक स्त्री कुटुंबातील, कुणाची आई, पत्नी, बहिण, आत्या, मावशी, आजी सुन, नंनद, असे नाते भूषवित असते, समाजात स्त्रीला फार महत्वाचे स्थान आहे, 
जस जशी प्रगती होत गेली, तस तशी समाजाची पण प्रगती होत गेली. समाज शिक्षण घेऊ लागला, पण पुर्वी स्त्रीला शिक्षण घेता येत नव्हते. खरी स्त्री शिक्षणाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांनी केली. तेव्हा कुठ आजची स्त्री शिक्षण घेतांना दिसते, मग खाजगी क्षेत्रात, सरकारी क्षेत्रात, वाहन चालक, वाहक, वैमानिक, पायलट, सैनिक मध्ये, पोलीस अधिकारी, राजकीय, धुरा कसोसीने पुरूषांच्या खाद्याला खांदा लावून काम करत आहे, हिच खरी ऊन्नती आहे,
शास्त्रज्ञ, अधुनिक शेती, गो -पारन, सर्व क्षेत्रात स्त्रीया आज पुढे आहे,जो स्त्रीयांना मानसन्मान देतो, तोच खरा मानवता धर्म आहे
 
लेखन,
 गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार