15 फेब्रुवारी ला सकाळी कलेवाडा येथील मोहन माणीक घोगरे , माजी सरपंच यांचेकडून तिर्री नियत क्षेत्रातील कक्ष क्र. १९८ संरक्षीत वनाच्या उत्तरेस ६०० मीटर अंतरावर तलावाच्या शेजारील बाजुस सौ. सरस्वता ज्ञानेश्वर घोगरे यांचे शेत सर्वे क्र २० मौजा कलेवाडा येथील विहरीत २ बिबट मृत अवस्थेत पडून असल्याची माहीती दिल्यावरून वन परीक्षेत्र अधिकारी अड्याळ श्री . घनश्याम ठोंबरे व क्षेत्र सहाय्यक अड्याळ श्री विनोद पंचभाई यांचे नेतृत्वात संपूर्ण कर्मचारी व अधिकारी यांनी घटना स्थळी पोहचुन घटना स्थळाची पाहणी केली . लगेच उपवन संरक्षक भंडारा श्री . भलावी साहेब व सहाय्यक वन संरक्षक श्री नागुलवार साहेब यांना कळविले . व राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांचे स्टंडर्ड ऑपरेशन प्रोसीजर नुसार कार्यवाही करून संपूर्ण क्षेत्राची तपासणी केली . लगेचच मा. उपवनसंरक्षक श्री . भलावी सर , सहाय्यक वन संरक्षक श्री . नागुलवार सर , प्रकाष्ट निष्कासन अधिकारी गडेगाव श्री . साकेत शेडे सर , सहायक वनसंरक्षक साकोली श्री रोशन राठोड , वनपरी क्षेत्र अधिकारी पवनी कू . कोमल जाधव , वनपरी क्षेत्र आधिकारी भंडारा श्री विवेक राजुरकर , वन परीक्षेत्र अधिवारी फिरते पथक श्री संजय मेंढे रॅपीड रेस्कू युनीटचे टिम सह हजर झाले . सोबतच मानद वन्य जीव रक्षक श्री . राजकमल जोग श्री शहीद खान सुद्धा हजर झाले . मृत बिबटा चे शवविच्छेदन डॉ. गुणवंत भडके , डॉ. अनु वराटकर , डॉ. विठ्ठल हटवार , डॉ देविदास रेहपाडे यांनी केले.