सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आमदार साहेब गोरगरीबांना लसीकरण मिळेल का?, उमरखेड तालुक्यातील ग्रामीण जनतेचा सवाल

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयभीत झालेल्या जनतेला लसीकरण हाच पर्याय दिसत असल्याने एकच झुंबड उडालेली आहे.

Sudarshan MH
  • May 13 2021 5:31PM



उमरखेड - प्रतिनिधी किरण मुक्कावार

          करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयभीत झालेल्या जनतेला लसीकरण हाच पर्याय दिसत असल्याने एकच झुंबड उडालेली आहे. लस मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करावी लागत असल्याने या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ असणार्‍या गोरगरीब जनतेला लसीपासुन मुकावे लागते की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. आदिवासी व गोरगरीब जनतेला ऑनलाईन काय असते हेच माहिती नसल्याने ग्रामीण भागातील गोरगरिबांना लस मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. आमदार साहेब आम्हालाही लस मिळणार का? असा सवाल उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता उपस्थित करत आहेत.
            उमरखेड तालुका हा आदिवासी तालुका असून आजही काही भागात इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. त्याच बरोबर ऑनलाइन बुकिंग कसे करावे याच ज्ञान नसल्यामुळे या ऑनलाईन बुकिंगच्या फंद्यात कोणी पडण्यास तयार नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता आजही लसीकरणापासून वंचित राहत आहे ही एक चिंतेची बाब आहे.आमदार नामदेव ससाने  त्यांच्याकडे उमरखेड तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा मोठ्या असून त्यांनी ऑनलाइनच्या फंद्यातून गोरगरीब जनतेचे सुटका करून सरळ सरळ लस उपलब्ध होईल असा पर्याय उपलब्ध करून द्यावे  अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार