सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लातूर व्यापारी महासंघ व महानगरपालिकेच्या वतीने व्यापारी , परिवार व कर्मचाऱ्यांसाठी मोफत लसीकरण सुविधा उपलब्ध

व्यापारी महासंघ व लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने फक्त व्यापारी , त्यांचा परिवार व कर्मचाऱ्यांसाठी मोफत कोरोना लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर लसीकरण सुविधा मंगळवार , दि. २४ ऑगस्ट २०२१ पासून औषधी भवन, सिग्नल कॅम्प, लातूर याठिकाणी सुरु करून देण्यात आली असून ती आठवडाभर सुरु असणार आहे

s.ranjankar
  • Aug 24 2021 5:46PM

लातूर : लातूर व्यापारी महासंघ व लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने फक्त व्यापारी , त्यांचा परिवार व कर्मचाऱ्यांसाठी मोफत कोरोना लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर लसीकरण सुविधा मंगळवार , दि. २४ ऑगस्ट २०२१ पासून औषधी भवन, सिग्नल कॅम्प, लातूर याठिकाणी  सुरु करून देण्यात आली असून ती आठवडाभर सुरु असणार आहे. 
                        कोरोनापासून स्वतःचा , परिवाराचा व समाजाचा बचाव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सध्या शासनाने सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापना नियमित सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे व्यापारी , दुकानात काम करणाऱ्या कर्मचारी - कामगारांचा नागरिकांशी संपर्क येतो. त्यामुळे व्यापारीवर्ग, त्यांचे परिवारातील सदस्य व कर्मचाऱ्यांसाठी हे लसीकरण अभियान सुरु करण्यात आले आहे. कोविशील्ड चा पहिला व दुसरा डोस तसेच कोव्हॅक्सिन चा फक्त दुसरा डोस या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही सुविधा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरु असणार आहे. 
कोरोनापासून संरक्षणासाठी व्यापारी , त्यांचे कुटुंबिय  व कर्मचाऱ्यांनी या लसीकरण सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा. व्यापारी महासंघाच्या सर्व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही आपआपल्या  परिवार, कर्मचाऱ्यांचे  शंभर टक्के लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्नशील रहावे  ,असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी मनपा आयुक्त अमन मित्तल  यांसह रामदास भोसले, विश्वनाथ किनीकर , बसवराज वळसंगे , कमल  जोधवानी,  भारत माळवदकर,  विनोद गिल्डा, राघवेंद्र इटकर, निसार  विंधानी,  मनिष  बंडेवार , दत्तात्रय पत्रावळे , उध्दव  पिनाटे, अमोल तांदळे,  मुस्तफा शेख, अतिश अग्रवाल यांसह  सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार