सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ६६ पैकी ४४ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा

चाळीसगाव तालुक्यातील ६६ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत.

Sudarshan MH
  • Jan 19 2021 6:26AM
 
 
 
 
 चाळीसगाव तालुक्यातील ६६ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. यावेळी पहिल्यांदा राष्ट्रवादी-शिवसेना- कॉंग्रेस महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगला होता. त्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील गटाने ४४ ग्रामपंचायतींवर बहुमत मिळवत भाजपचा झेंडा फडकवला आहे तर ७ ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक भाजप पदाधिकारी व इतर पक्षाचे पदाधिकारी यांनी मिळून बनविलेल्या पॅनल चे वर्चस्व आहे. या ७ ग्रामपंचायतींमधे देखील स्थानिक ग्रामपातळीवर सर्व पक्षांचे संमिश्र पॅनल असल्याने त्यात देखील भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत तसेच यापूर्वीच आमदार मंगेश चव्हाण यांच्या आवाहनानुसार तालुक्यातील ९ ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या असल्याने चाळीसगाव तालुक्यात भाजपचाच वरचष्मा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. विशेषतः बंजारा तांड्यामध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेने भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. 
 
दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात भेट देत जल्लोष केला. यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे स्वागत आमदार मंगेश चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, माजी तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे, पंचायत समितीचे गटनेते संजय भास्करराव पाटील, माजी सभापती दिनेशभाऊ बोरसे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, पंचायत समिती सदस्य पियुषदादा साळुंखे, तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ, अमोल नानकर, योगेश खंडेलवाल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, शहराध्यक्ष भावेश कोठावदे आदी उपस्थित होते. 
 
मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे विजयी उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपा कार्यालयात जमल्याने यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. सर्व विजयी उमेदवारांचा पुष्पहार व गुलाल टाकून सत्कार करण्यात आला.
 
भारतीय जनता पक्षाच्या ४४ ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व
 
तालुक्यातील टाकळी प्रदे, पिंप्री खु, नांद्र - काकळणे, अलवाडी, देशमुखवाडी, तामसवाडी, खडकी बु., तांबोळे, बिलाखेड, चितेगाव, कोदगाव - गणपूर, टाकळी प्रचा, तरवाडे, खरजई, भोरस, कळमडू, कुंझर, पोहरे, खेडी खु., दस्केबर्डी, रहीपुरी, बहाळ, टेकवाडे, पिंप्री बु प्रदे, देवळी, डोणदिगर, तमगव्हाण, वरखेडे, भउर, लोंढे, भवाळी, मुंदखेडे बु., वाघडू, हातले, मजरे, जामडी प्र.बा., रोकडे, बेलदारवाडी, बोढरे, जुनोने, शिंदी, पाटणा, ओढरे या ग्रामपंचायतींवर भाजपाने झेंडा रोवला असून पिलखोड, सायगाव, हातगाव, रोहिणी, पिंपळगाव, राजदेहरे, घोडेगाव या ग्रामपंचायतींमधे भाजपा व इतर पक्षाच्या स्थानिक आघाड्यांचे बहुमत असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम यांनी दिली.
 
यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आसुन ते म्हणाले की
ग्रामपंचायत निवडणूक या पक्षासाठी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने त्यांना बळ देणे गरजेचे होते. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे आव्हान असताना देखील मागील भाजपा शासनाने केलेल्या कामांच्या व लोकप्रतिनिधी म्हणून मागील वर्षभरात केलेल्या जनतेच्या सेवेच्या बळावर चाळीसगाव तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायंतीमध्ये भाजपची सत्ता आली आहे. हे भाजपाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे यश असून आगामी काळात यशाचा हाच आलेख जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीत कायम ठेवण्याचा प्रयत्न राहील. काही गावांमध्ये जरी अपयश आले असले तरी त्या ठिकाणी अजून जास्त कामे करून जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करू. तालुक्याचा आमदार या नात्याने सर्व पक्षीय विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतो. गावाच्या विकासासाठी मी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मदत करेल असे आश्वासन देतो. ज्यांचा पराभव झाला असेल त्यांनी खचून न जाता अधिक जोमाने जनतेची सेवा करावी. आता निवडणूका संपल्या असून सर्वांनी गतकाळातील बरे - वाईट अनुभव विसरून शांततेने व एकोप्याने आपल्या गावाच्या विकासासाठी काम करावे आसे आवहान आमदार मंगेश चव्हाण यांनी विजय उमेदवाराना केले आहे -

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार