सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

“यांचं म्हणजे ना..नाचता येईना अंगण वाकडं, रांधता येईना…”, प्रविण दरेकरांचा शिवसेनेवर पलटवार

मुंबईकरांसाठी नेमेचि येतो पावसाळा प्रमाणेच नेमेचि तुंबते मुंबई असं म्हणण्याची वेळ नुकत्याच झालेल्या पहिल्याच पावसाने आणली.

Sudarshan MH
  • Jun 12 2021 4:53PM


मुंबईकरांसाठी नेमेचि येतो पावसाळा प्रमाणेच नेमेचि तुंबते मुंबई असं म्हणण्याची वेळ नुकत्याच झालेल्या पहिल्याच पावसाने आणली. दरवर्षी मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचतं आणि मुंबईकरांची ससेहोलपट होते. यंदाही तेच दृश्य दिसल्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपाकडून सत्ताधाऱ्यांना टिकेचे कडू डोस पाजले जात आहेत. मात्र, त्यावर शिवसेनेकडूनही उलट आरोप होऊ लागल्यानंतर भाजपानं आपला विरोध अधिक खोचक केला आहे. भाजपाचे आमदार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबईत पाणी साठल्यावरून केंद्रावर टीका करणाऱ्या शिवसेनेला खोचक शब्दांमध्ये टोला हाणला आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या एका विधानावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आलं अंगावर की ढकललं केंद्रावर!
राहुल शेवाळे यांनी मुंबईची तुंबई होण्याला केंद्र सरकारला जबाबदार धरल्यानंतर प्रविण दरेकरांनी त्यावर टोला लगावला आहे. “यांचं म्हणजे ना… नाचता येईना अंगण वाकडं, रांधता येईना ओली लाकडं! स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आलं अंगावर की ढकललं केंद्रावर!”, अशा शब्दांत प्रविण दरेकर यांनी ट्विटरवरून खोचक टीका केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचून मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. सगळ्याच महत्त्वाचं म्हणजे मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल देखील ट्रॅक्सवर पाणी साचल्यामुळे काही काळ बंद ठेवावी लागल्यामुळे यावर मुंबईकरांची तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार