सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सरकारल मराठ्यांच्या पोरांची काळजी नाही माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा सरकारवर प्रहार

राज्यातील आघाडी सरकारला मराठा समाजातील पोरांची काळजी नसून मराठा समाजाचे आरक्षण हरवलेल्या सरकारला समाज कदापि माफ करणार नाही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व सारथी सारख्या मराठा विद्यार्थ्यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावणाऱ्या संस्थांना तिलांजली देऊ पाहणाऱ्या सरकारला मराठा समाजाबद्दल द्वेष असल्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे

Sudarshan MH
  • Jun 7 2021 4:36PM


जालना येथील मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह त्या इमारतीत सुरू करा

राज्यातील वस्तीगृह सुरू न केल्यास भाजपा राज्यभर आंदोलन करणार

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सारथी सारख्या संस्था आघाडी सरकारने दुर्लक्षित केल्या

राज्यातील आघाडी सरकारला मराठा समाजातील पोरांची काळजी नसून मराठा समाजाचे आरक्षण हरवलेल्या सरकारला समाज कदापि माफ करणार नाही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व सारथी सारख्या मराठा विद्यार्थ्यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावणाऱ्या संस्थांना तिलांजली देऊ पाहणाऱ्या सरकारला मराठा समाजाबद्दल द्वेष असल्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे
  ते जालना येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवाजी पुतळा स्थित शासकीय विश्रामगृहामध्ये प्रस्तावित मराठा समाजाच्या मुलांचे वसतिगृह सुरू करण्यात यावे या मागणी संदर्भात करण्यात आलेल्या आंदोलना प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की राज्यातील सरकारने मराठा आरक्षणाला हरताळ फासत मराठा समाजासाठी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व सारथी सारख्या संस्थांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देऊन मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला होता मात्र राज्यात आलेल्या आघाडी सरकारने या सर्व मराठा समाजाची संबंधित असलेल्या संस्थांना ब्रेक लावला त्यामुळे मराठा मुलांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली
पुढे बोलताना ते म्हणाले की परतूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय जालना येथे शिवाजी पुतळा स्थित विश्राम गृहा मध्ये मराठा मुलांच्या वसतिगृहा देण्यात आलेल्या इमारती मध्ये पालकमंत्री राजेश टोपे हे अन्याचा घालत असून  आपण कदापि हे सहन करणार नसून टोपेंच्या या कृतीला उत्तर देणार असल्याचेही ते म्हणाले

सरकारने राज्यातील मराठा समाजासाठी ची सर्व वस्तीगृह सुरू करावीत

मराठा समाजाचे आरक्षण घालवणार या राज्यातील सरकारने किमान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी मराठा समाजातील मुलांना वस्तीग्रह मंजूर केले होते मात्र राज्यात झालेल्या सत्तांतरा नंतर आघाडी सरकारने जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मराठा समाजावर अन्याय केला असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली

परतूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय जालन्याला हलविण्याचा खटाटोप कशासाठी?

सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभाग क्रमांक दोन चे कार्यालय जालना येथे हलविण्याचा खटाटोप पालकमंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून केला जात आहे सर्वदूर अंतराच्या दृष्टिकोनातून परतूर हा मध्यबिंदू असूनही कार्यालय जालन्याला हलवण्याचा अट्टाहास का असा सवालही यावेळी लोणीकर यांनी उपस्थित केला
यावेळी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर युवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप गोरे जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव बोराडे भाजपा तालुका अध्यक्ष रमेश भापकर  सतीश निर्वळ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष  गणेशराव खवणे विलासराव आकात उपसभापती नागेश घारे पंचायत समिती सदस्य दिगंबर मुजमुले रामेश्वर तनपुरे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजित जोगस युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संपत टकले  युवा मोर्चा तालुका अध्यक्ष  छत्रगुन कणसे  ज्ञानेश्वर शेजुळ अंकुशराव बोबडे संभाजी खंदारे निवास देशमुख महेश पवार महादेव वाघमारे ज्ञानेश्वर माऊली सोळंके रवी सोळंके भागवत मानवतकर रमेशराव केवारे पुष्कर कदम पंकज कुलकर्णी शिवराज नारियल वाले गोविंद ढेंबरे अश्विनी आंधळे सचिन नारियल वाले रवि दांडगे जितो मुटकुळे राहुल देशपांडे विनोद दळवी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार