सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अनिल देशमुखांच्या अडचणीत पुन्हा वाढ; ED कडून निकटवर्तीयाच्या घरी छापेमारी

१०० कोटी वसुलीप्रकरणी अडचणीत सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी अद्यापही कायम आहे.

Sudarshan MH
  • May 26 2021 11:16AM


१०० कोटी वसुलीप्रकरणी अडचणीत सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी अद्यापही कायम आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आज नागपूरमधील त्यांच्या निकटवर्तीय असलेला सागर भटेवारच्या घरावर छापा टाकला आहे

नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जवळचे मानले जाणारे व्यावसायिक सागर भटेवारच्या घरी आज ईडीने धाड टाकली. भटेवार हा नागपूर येथील शिवाजी नगर परिसरातील रहिवाशी आहे. गेल्या काही दिवसांपासून भटेवार हा देशमुखांच्या संपर्कात होते, त्यामुळेच ईडीने भटेवारच्या घरावर छापा टाकला. भटेवारची चौकशी करत काही महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या पथकाने जप्त केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सागर भटेवार हा अनिल देशमुख यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

याआधी अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. या प्रकरणात ईडीने देशमुखांवर ECIR म्हणजेच एफआयआर दाखल केला. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने तपास करून देशमुख यांच्यावर २१ एप्रिल रोजी दिल्ली पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. या FIR च्या अनुषंगाने सीबीआयने देशमुखांच्या मुंबई आणि नागपूर येथील घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार