सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे

Snehal Joshi. MH
  • Mar 23 2021 9:45PM
 
 मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खंडणी वसुली च्या आरोपाचे संतप्त पडसाद दिसू लागले आहेत. 
 
 महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकार स्थापनेनंतर आत्तापर्यंत ठाकरे सरकार प्रश्नांच्या भोवर्‍यात फिरत आहे.
 
  कोरोना, चक्रीवादळ, थकित अतिरिक्त विद्युत बिल, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या, मुंबई महानगरपालिका वर्सेस कंगना, अर्णव गोस्वामी असो वा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी फसलेले वन मंत्री संजय राठोड... या आणि अशा कितीतरी प्रश्नातून श्वास घ्यायला फुरसत नसलेल्या ठाकरे सरकार पुढे पुन्हा एक यक्ष प्रश्न उभा राहिला. तो म्हणजे गृह मंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा... 
 
 मनसुख हिरेन प्रकरणापासूनच भारतीय जनता पार्टी हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची व सखोल चौकशीची मागणी करीत आहेत. अशात आता 'लेटर बॉम' आणि सचिन वाजे यांची दैनंदिनी म्हणजे भाजप ला परत एकदा गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी साठी संधीच..... 
 
 संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याने वन मंत्रीपद आधीच रिक्त आहे.
 भारतीय जनता पार्टीने पिच्छा पुरवलेला विषय म्हणजेच विद्युत बिल.. त्यामुळे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या सुद्धा पदात फेरबदल होण्याची शक्यता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी पासून वर्तवली जाते आहे. 
त्यातच आता महाराष्ट्र सरकार गृहमंत्र्यांच्या आरोपावर गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी त्यांनी एक चौकशी पॅनल निर्माण केले आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश या चौकशी पॅनल चे अध्यक्ष होणार असल्याचे समजले आहे. 
 आणि आज संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एक बैठक बोलावली आहे. त्याआधी किंवा त्यानंतर या मंत्रिमंडळात बदल होण्याचे संकेत.....

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार