सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापूरात शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट सोयाबीन बियाण्याची चढ्या दराने विक्री

नवापूर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रामधून जास्त भावाने सोयाबीनची विक्री होत असल्याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांना निवेदन दिले आहे.

Nandurbar MH
  • Jul 2 2021 10:18AM

नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे
           नवापूर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रामधून जास्त भावाने सोयाबीनची विक्री होत असल्याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांना निवेदन दिले आहे. सोयाबीनची एक तरी (३०.किलो ) वजन रक्कम ३०००/ ते ४०००/ तसेच ४२०० / पर्यंत विक्री सुरू आहे त्यामुळे ढवळ्या शेतकरी लुटला जात आहे .ओस्वाल या कंपनीचे सोयाबीनचे बियाणे आधी रक्कम रुपये ३२००/ ते ३३००/३४००/अशी विक्री होत होती तेच बियाणे आता ३८००/   रुपये  प्रमाणे विक्री होत आहे‌ .एका पिशवी मागे ६००/ रुपये जादा दराने विक्री होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. 
          त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकरी अधिक अडचणीत आलेला आहे .एकीकडे नवापूर तालुक्यात युरिया खताचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे तालुका कृषी कार्यालय व पंचायत समितीचे कृषी विभाग तसेच शेतकरी संघ नवापूर यांचेकडून याबाबत काहीही स्पष्टीकरण होताना दिसत नाही त्यामुळे      शेतकरी कंटाळलेला आहे दरवर्षी खताचा तुटवडा होतो त्याची माहिती संबंधित विभागांना असून देखील खताचा नियोजन संबंधितांकडून होत नाही ही फारच गंभीर बाब असून याकडे शासन लक्ष देईल का असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी शेतकऱ्यांना खताचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा तसेच सोयाबीनच्या चढत्या भावाने विक्री करणाऱ्या खाजगी कृषी केंद्रांची चौकशी करून त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा तसेच नवापूर तालुक्याचा युरिया खताचा कोटा कुठे वळविला जातो याची संपूर्ण चौकशी करण्यात आवी.व बियाणे व खत योग्य दरात उपलब्ध करून    देण्यात यावे अन्यथा अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन छेडेल व होणाऱ्या परिणामास सर्वश्री प्रशासन जबाबदार राहील याची नोंदणी प्रशासनाने घ्यावी असे अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष.आर.सी.गावीत यांनी सांगितले आहे.
भूमी जनशक्ती परिवर्तन किसान शेतकरी संघटना नवापूर तालुका अध्यक्ष.दिलीप गावीत, रुद्र अपंग संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष .गुलाब गावीत हे देखील उपस्तीत हिते.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार