सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकरी भिक मागत नाहीत, हक्‍क मागत आहेत, नाही दिला तर संचालकांना फिरू देणार नाही-प्रदिप पाटील खंडापूरकर

भाजपा नेते प्रदिप पाटील खंडापूरकर यांचा मांजरा परिवाराला इशारा. कारखान्याचे संचालक हे मालक नाहीत तर विश्वस्त असतात शेतकरी भीक मागत नाहीत त्यांना त्यांच्या कष्टाचा आणि हक्काचा भाव पाहिजे श्रीशैल्‍य उटगे मांजरा परिवारातील साखर कारखाने एफआरपी प्रमाणे भाव कधी देणार हे तात्काळ जाहीर करा अन्यथा रस्त्यावर गाड्या फिरू देणार नाही असा इशारा भाजपाचे नेते प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

s.ranjankar
  • Aug 2 2021 2:48PM

 

 

लातूर - कारखान्याचे संचालक हे मालक नाहीत तर विश्वस्त असतात शेतकरी भीक मागत नाहीत त्यांना त्यांच्या कष्टाचा आणि हक्काचा भाव पाहिजे श्रीशैल्‍य उटगे मांजरा परिवारातील साखर कारखाने एफआरपी प्रमाणे भाव कधी देणार हे तात्काळ जाहीर करा अन्यथा रस्त्यावर गाड्या फिरू देणार नाही असा इशारा भाजपाचे नेते प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.कारखान्याचे शेतकरी सभासद हेच खरे मालक आहेत संचालक मालक नसून नौकर आहेत त्यांनी शेतकऱ्यांना गुलामासारखे वागवू नये असे सांगून प्रदीप पाटील खंडापूरकर म्हणाले की, मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी शासनाच्या नियमानुसार एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना गाळप केलेल्या उसाला भाव दिला पाहिजे. आम्ही कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी आहेत म्हणून उसाच्या भावाची मागणी करतोय जाब विचारतोय हे विसरता कामा नये. लातूर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतो या पिकावरच शेतकऱ्याचे अर्थकारण अवलंबून आहे. त्यामुळे मांजरा परिवारातील मांजरा विलास आणि रेणा या साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसाला एफआरपी प्रमाणे भाव द्यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी दिला होता याबाबत मांजरा कारखान्याचे विश्वस्त श्रीशैल्‍य उटगे यांनी खुलासा वजा पत्र कडून मांजरा परिवार सर्वोत्कृष्ट असल्याचा गवगवा करत स्वतःची पाठ थोपटून घेतली मात्र एफआरपी प्रमाणे उसाला भाव कधी देणार हेच जाहीर केले नाही.  इतर एक दोन कारखान्यांनी काय केले त्यांच्याकडे बोट दाखवण्याची आम्हाला गरज नाही आम्ही कारखाना कार्यक्षेत्रातले ऊस उत्पादक शेतकरी आहोत शासनाच्‍या नियमाप्रमाणे हक्काने भाव मागत आहोत आणि हक्काने मिळवून घेणारच असे सांगून प्रदीप पाटील खंडापूरकर म्हणाले की, श्रीशैल्‍य उटगेजी एफआरपी प्रमाणे भाव नुसता देणार म्हणून चालणार नाही तो दिलाच पाहिजे शेतकऱ्यांच्या कष्टाचे घामाचे मोल झाले पाहिजे तो त्यांचा हक्क आहे. मागील काळात ऊस असतानाही खाजगी कारखान्याच्या हितासाठी सहकारी कारखाने बंद ठेवले हा शेतकऱ्यावर केलेला अन्याय नाही का ? असा प्रश्न उपस्थित करून ज्या काळात ऊस कमी होता तेव्हाच एफआरपी प्रमाणे किंबहुना त्याहून अधिक भाव दिला. उसाची गरज होती म्हणून भाव दिला असेही प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी बोलून दाखविले. मांजरा परिवारातील कारखाने प्रतिटन 2200/-  रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना दिले मात्र एफआरपी प्रमाणे फरकाची रक्कम प्रति टन मांजरा कारखाना 575 रुपये विलास कारखाना 499 रुपये विलास-२ तोंडार 334 रुपये आणि रेणा कारखाना 656 रुपये ही फरकाची रक्कम कधी देणार हे तात्काळ जाहीर करावे अन्यथा कारखान्याच्या संचालकाच्या गाड्या फिरू देणार नाही असा इशाराही प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी आपल्या पत्रकातून दिला आहे.


 
 
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार