सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदूरबार जिल्हयातील धडगाव तालुक्यातील सिंधीदिगर गावात बनावट दारूचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केला उध्वस्त

बनावट दारूचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केला उध्वस्त

Nandurbar MH
  • Nov 12 2020 10:45AM

.

नंदूरबार जिल्हयातील धडगाव तालुक्यातील सिंधीदिगर गावात बनावट दारूचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केला उध्वस्त

तोरणमाळ पासून 15 किमी खाली असलेले सिंधी दिगर गावात बेकायदेशीर बनावट दारू चा कारखाना सुरू असल्याचे मा.पोलीस निरीक्षक श्री.विजयसिंग एच.राजपूत यांना गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाल्याने मा.पोलीस अधीक्षक श्री.महेंद्र पंडित साहेब ,अपर पोलीस अधीक्षक श्री.विजय पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे, पथक सदर गावी कार्यवाही करणे कामी पाठविले असता सदर ठिकाणी बनावट दारू चा कारखाण्यावर पथकाने रात्री छापा मारला असता छाप्यात बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे 250 लिटर स्पिरिट,बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे मशीन, खाली काचेच्या बाटल्या,बनावट बाटलीवरील बूच,बनावट स्टिकर तसेच सुगंधी द्रव्य व एकूण 1260 टॅगो कंपनीचे विक्री करण्यासाठी बनविलेले बनावट दारूच्या बाटल्या असे एकूण 1,31,320 /- रु चा मुद्देमाल जप्त केला.. व सदरचा मुद्देमाल म्हसावद पोस्टे च्या ताब्यात देऊन,बनावट दारू कारखाना चालविणाऱ्या इसमा विरुद्ध पोना/विकास अजगे यांनी दारूबंदी कायद्याने कायदेशीर फिर्याद दिली आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.विजयसिंग एच.राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, पोलीस हवालदार रवींद्र पाडवी,पोह/विनोद जाधव,पोह/सजन वाघ,पोना/विकास अजगे,पोना/जितेंद्र तांबोळी,पोशी/विजय ढिवरे,पोशी/अभय राजपूत अश्यानी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार