सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई 66 लाखाचा अवैध मद्यसाठा केला जप्‍त

शहादा : अक्कलकुवा तालुक्यात दोन ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापेमारी करून सुमारे 66 लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त केला

Nandurbar MH
  • Dec 29 2020 6:40PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

शहादा : अक्कलकुवा तालुक्यात दोन ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापेमारी करून सुमारे 66 लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी अटक केलेल्या सहा संशयितांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर झालेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
खापर ते मोरंबा आणि अक्कलकुवा ते खापर या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तीन वाहने जप्त केली. एकूण ६६ लाख रुपयांचा मुद्देमाल पथकाने ताब्यात घेतला . खापर ते मोरंबा रस्त्यावर जीजे ०६ सी एम ५४०७ या वाहनाची तपासणी पथकांकडून करण्यात आली होती. त्यात परराज्यत विक्रीसाठी नेण्यात येणारे एकूण २० विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आले.  या प्रकरणी पथकाने दोघांना ताब्यात घेत मद्य व वाहन असा ६ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान अक्कलकुवा ते खापर मार्गावर डीएन ०९ एम ९२९४ व एमएच ०४ एमपी  ३१३६ या ६० लाख ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पथकाने केलेल्या या धडक कारवाईत एकूण ६६लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार संशयित ताब्यात घेण्यात आले असून त्यांना न्यायालयात हजर केले. ६ दिवसाची कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागीय उपयुक्त अर्जुन ओहोळ ,अधीक्षक युवराज राठोड मार्गदर्शनात पथकाने केली

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार