सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) केतन रघुवंशी
शहादा : अक्कलकुवा तालुक्यात दोन ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापेमारी करून सुमारे 66 लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी अटक केलेल्या सहा संशयितांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर झालेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
खापर ते मोरंबा आणि अक्कलकुवा ते खापर या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तीन वाहने जप्त केली. एकूण ६६ लाख रुपयांचा मुद्देमाल पथकाने ताब्यात घेतला . खापर ते मोरंबा रस्त्यावर जीजे ०६ सी एम ५४०७ या वाहनाची तपासणी पथकांकडून करण्यात आली होती. त्यात परराज्यत विक्रीसाठी नेण्यात येणारे एकूण २० विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आले. या प्रकरणी पथकाने दोघांना ताब्यात घेत मद्य व वाहन असा ६ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान अक्कलकुवा ते खापर मार्गावर डीएन ०९ एम ९२९४ व एमएच ०४ एमपी ३१३६ या ६० लाख ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पथकाने केलेल्या या धडक कारवाईत एकूण ६६लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार संशयित ताब्यात घेण्यात आले असून त्यांना न्यायालयात हजर केले. ६ दिवसाची कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागीय उपयुक्त अर्जुन ओहोळ ,अधीक्षक युवराज राठोड मार्गदर्शनात पथकाने केली