सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दूरसंचार कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील चेकची चोरी करून त्यावर बनावट सह्या करून 09 लाख 94 हजार रुपयाचा अपहार

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, लातूर मधील गांधी चौकात असलेल्या लातूर जिल्हा दूरसंचार कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे प्रशासक श्री. जीवन गोपाळराव जाधव (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,औसा) यांनी आज रोजी पोलीस ठाणे गांधी चौक येथे तक्रार दिली की, ते प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या जिल्हा दूरसंचार कर्मचारी सहकारी पतसंस्था मधील कंत्राटी कर्मचारी प्रशांत वीरपाक्षप्पा सैदापुरे यांनी पतसंस्थेच्या बँक खात्याचे 05 चेक चोरून त्यावर प्रशासकाचे खोट्या सह्या करून पतसंस्थेचे सभासद नसलेल्या व्यक्तीच्या नावावर देऊन पतसंस्थेचे 9 लाख 94 हजार 453 रुपये काढून घेतले अशी तक्रार दिली.

S.n.ranjankar
  • Dec 9 2021 5:43PM
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, लातूर मधील गांधी चौकात असलेल्या लातूर जिल्हा दूरसंचार कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे प्रशासक श्री. जीवन गोपाळराव जाधव (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,औसा) यांनी आज रोजी पोलीस ठाणे गांधी चौक येथे तक्रार दिली की, ते प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या जिल्हा दूरसंचार कर्मचारी सहकारी पतसंस्था मधील कंत्राटी कर्मचारी प्रशांत वीरपाक्षप्पा सैदापुरे यांनी पतसंस्थेच्या बँक खात्याचे 05 चेक चोरून त्यावर प्रशासकाचे खोट्या सह्या करून पतसंस्थेचे सभासद नसलेल्या व्यक्तीच्या नावावर देऊन पतसंस्थेचे 9 लाख 94 हजार 453 रुपये काढून घेतले अशी तक्रार दिली.त्यावरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 643/2021 कलम 379, 420, 467,  468,  471, 34 भादवी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व गुन्ह्याचा तपास गांधी चौक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत लोंढे यांच्याकडे देण्यात आला.पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री, अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) श्री.जितेंद्र जगदाळे व  पोलीस निरीक्षक श्री. प्रेमप्रकाश माकोडे यांचे मार्गदर्शनात सपोनि प्रशांत लोंढे यांनी लागलीच तपास सुरू करून जिल्हा दूरसंचार कर्मचारी सहकारी पतसंस्था मध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणुकीस असलेला इसम नामे प्रशांत वीरपाक्षप्पा सैदापुरे यास ताब्यात घेऊन गुन्हा संदर्भाने विचारपूस केली असता त्याने, पतसंस्थेमध्ये काम करीत असताना पतसंस्थेच्या बँकेचे खात्याच्या चेकचा गैरवापर करून त्यावर बनावट सह्या करून त्याचे ओळखीची एक मुलगी व सिद्राम गणपत साठे हे सदरच्या पतसंस्थेचे सभासद नसतानाही यांच्या नावे चेक देऊन पतसंस्थेच्या खात्यावर वटवून सोसायटीची फसवणूक केल्याचे सांगत असल्याने इसम नामे 
1) प्रशांत वीरपाक्षप्पा सैदापुरे, वय 27 वर्ष, राहणार- खंडोबा गल्ली  लातूर.
2) सिद्राम गणपत साठे, वय 27 वर्ष, राहणार- गवळी गल्ली, लातूर. व एक 25 वर्षीय मुलगी
अशांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे गांधी चौक येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.प्रशांत लोंढे हे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार