सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कन्याकुमारीच्या ‘स्वामी विवेकानंद शिला स्मारका’चे शिल्पकार एकनाथ रानडे यांचा स्मृतिदिन.

बंगालमध्ये जन्माला आलेल्या’ विवेकानंदांचे स्मारक तमिळनाडूमध्ये कशाला उभारायचे, असा प्रश्न विचारणाऱ्या मुख्यमंत्री भक्तवत्सलम यांच्यासह सर्वांना बरोबर घेऊन एकनाथजींनी ज्या पद्धतीने ते भव्य शिलास्मारक उभारून दाखवले, ते खरोखरच लोकविलक्षण होते.

Snehal Joshi . सौजन्य- विवेकानंद केंद्र नागपुर
  • Aug 22 2020 9:24PM
सामान्य वाटणारा माणूस देहभक्तीने आणि समाजप्रीतीने भारला गेला तर केवढे मोठे कार्य उभे करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे *एकनाथजी रानडे* आणि त्यांनी उभारलेले कन्याकुमारी येथील *विवेकानंद शिला स्मारक!* ‘बंगालमध्ये जन्माला आलेल्या’ विवेकानंदांचे स्मारक तमिळनाडूमध्ये कशाला उभारायचे, असा प्रश्न विचारणाऱ्या मुख्यमंत्री भक्तवत्सलम यांच्यासह सर्वांना बरोबर घेऊन एकनाथजींनी ज्या पद्धतीने ते भव्य शिलास्मारक उभारून दाखवले, ते खरोखरच लोकविलक्षण होते. ती मोहीम यशस्वी करून दाखवताना त्यांनी जे संघटनाचातुर्य दाखवले होते, ते पाहून लालबहादूर शास्त्रींनी असे सहज उद्गार काढले होते की, ‘मला दोन एकनाथ रानडे मिळाले, तर मी काँग्रेसचे भवितव्य बदलवून दाखवीन.’ तथापि एकनाथजींचे सारे गुणवैभव एखाद्या राजकीय पक्षाच्या विस्तारासाठी किंवा एखाद्या प्रभावी क्षेत्राच्या परिवर्तनासाठी वापरले जावे, असा नियतीचा संकेतच नव्हता मुळी. ते झाले होते पूर्ण देशाला समर्पित असे जीवनव्रती. रा. स्व. संघाचे संस्कार तनमनात मुरवत एकनाथ रानडे सर्वार्थाने विकसित होत गेले. एकीकडे शारीरिक कसरतीच्या मार्गाने मिळवलेली शक्ती अरेरावी करणाऱ्या ब्रिटिश सैनिकांविरुद्ध वापरून रेल्वेच्या डब्यातील आपली आणि आपल्या बरोबरच्या स्वयंसेवकांची जागा परत मिळवण्याइतपत ते धट्टाकट्टा झाले होते; तर दुसरीकडे उपनिषदांपासून ‘गीतारहस्या’पर्यंत अनेक धर्मग्रंथांचे वाचन-मनन करून मिळवलेले ज्ञान महाविद्यालयातील बायबलच्या तासाला वापरून ख्रिस्ती मिशनरी प्राध्यापकांकडून केली जाणारी हिंदू धर्माची निंदानालस्ती थांबवण्याइतका तो वादपटूही झाला होता. तत्त्वज्ञान हा विषय घेऊन नागपूर विद्यापीठामधून एम. ए. पदवी मिळवताना त्याने विवेकानंद साहित्याचे अनेकदा वाचन केले. स्वामीजींच्या कार्याचा, संदेशाचा त्याच्यावर खूप खोलवर परिणाम झाला. त्या कार्याशी-संदेशाशी संघकार्याचा गाभा सुसंगत असल्याचे त्यांना त्यावेळीच जाणवले आणि घरच्यांचा लग्नाचा आग्रह डावलून ते रा. स्व. संघाचे प्रचारक झाले. कन्याकुमारीच्या ‘स्वामी विवेकानंद शिला स्मारका’चे शिल्पकार एकनाथ रानडे यांचा आज स्मृतिदिन. अमरावती जिल्ह्यातील तिमताला येथे दि. १९ नोव्हेंबर १९१४ रोजी जन्मलेला हा एकनिष्ट संघ स्वयंसेवक. नागपूर विद्यापीठातून तत्त्वज्ञानातील एम. ए. व सागर विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केलेल्या एकनाथजींना शालेय जीवनापासूनच डॉ. हेडगेवारांचा सहवास लाभला होता. त्यांच्याच प्रभावामुळे ‘स्वयंसेवक’ बनलेल्या एकनाथजींनी पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह पदही भूषवले. सन १९६३ मध्ये स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी ‘राऊजिंग कॉल टू हिंदू नेशन’ हा ग्रंथ संकलित केला आणि लगेचच कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिला स्मारकाची कार्यधुरा उचलली. एकनाथजींच्या अथक परिश्रमामुळे आणि कल्पकता, चिकाटी आणि संघटना कौशल्यामुळेच ते भव्य स्वप्न सत्यात उतरून आज हिंदी महासागरात दिमाखाने उभे आहे. स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत अशा बलवादी भारताची उभारणी त्याग आणि सेवा यांच्या आधारेच घडवावी म्हणून एकनाथजींनी ते सा-या राष्ट्राला मार्गदर्शक ठरावे, असे ‘विवेकानंद केंद्र’ – अशा या एकनाथजींनी दि. २२ ऑगस्ट १९८२ रोजी अखेरचा श्वास घेतला. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार