सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*तुम्ही वाघासारखे जागा , म्हणजे तुमच्या वाट्याला कोणी येणार नाही -भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर*

शिक्षण, संघटन, संघर्ष, यातून गगनभेदी ज्ञानाच्या सहायाने शोषित ,पीडित, हाजरो वर्षे गुलामगिरी च्या व अस्पृश्यतेच्या खाईत लोटल्या गलेल्या पीडितांना शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पितो तो गुरगुरल्या

Sudarshan MH
  • Apr 13 2021 6:04PM

14 एप्रिल 2021 जन्मोत्सव विशेष लेख..

शिक्षण, संघटन, संघर्ष, यातून गगनभेदी ज्ञानाच्या सहायाने शोषित ,पीडित, हाजरो वर्षे गुलामगिरी च्या व अस्पृश्यतेच्या खाईत लोटल्या गलेल्या पीडितांना शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पितो तो गुरगुरल्या
शिवाय राहत नाही या ज्वालामुखी विचाराने अन्यायावर
वार करणारे महामानव. १४ एप्रिल १८९१ ला महू,
मध्यप्रदेश च्या लष्करी छावणीत त्यांचा जन्म झाला .
त्यांचे वडील रामजी संकपाळ यांनी सैनिकी शाळेत असताना चांगलं शिक्षण मिळालं , व सैन्यात नोकरी करू लागले.
अवघे सहा वर्षाचे असताना बाबासाहेबांना मातृशोक झाला . आई भिमाई यांचं निधन झालं. बाबासाहेबांच्या आत्या त्यांच्यावर
कटाक्षाने , व प्रेमाच्या छायेने लक्ष ठेवत. बाबासाहेबांना वाचनाची
प्रचंड आवड होती .बाबासाहेबांचे वडील त्यांच्या अवांतर वाचना
साठी भिमाची इच्छा पूर्ण करत असत. जर स्वतः जवळ पैसे नसतील तर आपल्या जवळच्या , अथवा सावकारा कडून पैसे घेऊन पुस्तक आणत असत. या प्रचंड इच्छा शक्तीमुळे बाबासाहेबांची प्रेरणा वाढत गेली. बाबासाहेब म्हणजे एक प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय; डॉ बाबासाहेब हे केवळ पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी श्रमिकांच्या, शोषीतांच्या, दिनदुबळ्या अंध:कारमय
जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिलेला आढळतो.खरे पाहता डॉ बाबासाहेब
आंबेडकर हे एक अस्तपैलू व्यक्तीमत्व होते.भारतातील मागासलेल्या
वर्गाच्या प्रगतिकरिता आपल्या संपूर्ण जीवनाचा त्याग त्यांनी केला.
माणसाला स्वाभिमान शिकविला. संकटांशी सामना करायला
शिकवला , आणि स्वतः च्या विश्रांती चा त्याग केला. सामाजिक,
राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, मानवशास्त्र, तत्वज्ञान, घटना शास्त्र,
राजकारण , शिक्षण, मानवी हक्क, पत्रकारिता, कायदा व अनेक अश्या विविध क्षेत्रात कुशल, खंबीर, बाबासाहेबांच्या नेतृत्वातुन तमाम शोषित व पीडितांना समाज क्रांतीचे स्फुर्ती देणारे ठरले जी लोक आपला इतिहास जाणत नाहीत ती आपला इतिहास घडवू
शकत नाहीत म्हणून शिक्षणापासून वंचित बांधवांना जागृत केले.
शिक्षण हे समाजाचे प्रभावी माध्यम आहे. शिक्षणाने माणसाला
आपल्या कर्तव्य व हक्काची जाणीव होते हे त्यांनी ओळखले होते.
म्हणून शिक्षणाची जागृती करतांना डॉ बाबासाहेब आंबेडकर
म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पितो तो गुरगुरल्या
शिवाय राहत नाही .मुलगा असो वा मुलगी शाळेत दाखल झाले की पूर्णपणे सुशिक्षित ,माहितीपूर्ण ज्ञान व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडले पाहिजेत. समाजाच्या सर्व स्तरा पर्यंत शिक्षण गेले
पाहिजे. कारण शिक्षण हे बुद्दी चे ज्ञान आहे. ते प्राप्त झाल्याने व्यक्तीच्या बोद्धीक पातळीत वाढ होते. विचार सशक्त होतात. व्यक्तीला चांगले वाईट यांचा निर्वाळा
करता येतो.म्हणजेच सत्य व असत्य यांचा फरक लक्षात
येतो. शाळा ह्या समाजाच्या उत्तम नागरिक , कर्तव्य दक्ष
नागरिक बनवण्याचे सर्वोत्तम कारखाने आहे असं डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते. प्राथमिक शिक्षणाकडे सर्व समाजातील घटकाने अतिशय गंभीर पने लक्ष द्यावे असे प्रतिपादन ते करत. शिक्षणाचा दिवा तेवत राहण्यासाठी बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी १९४६ ला स्थापन करून
मुंबई ला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबाद ला मिलिंद महाविद्यालय सुरू
केले. शैक्षणिक विचारा सोबतच डॉ बाबासाहेब हे शेतमजूर ,स्त्रिया ,यांच्या विषयक समानतेचा हक्क सांगताना दिसतात. स्त्रियांना पुरुषांच्या
प्रमाणे समान हक्क मिळावे. स्त्रियांचा सामाजिक ,राजकीय ,कायदेशीर
दर्जा वाढवा यासाठी नेहमीच प्रयत्न केले. बाबासाहेब हे सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. जगातील सर्वात मोठी लिखित  राज्यघटना भारताला देऊन देशभर व जगभर आपली छटा उमटवली.
बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी भारताच्या नव्हे तर जगाच्या
कानाकोपऱ्यातील असंख्य अनुयायी डॉ बाबासाहेबांच्या ऐतिहासिक ठिकाणी दाखल होत असतात. आणि महत्त्वाचे म्हणजे कोणीही येथे येऊन भौतिक सुखाची मागणी करत नाही ?नवस करत नाही ? संपत्ती साठी साकडे घालत नाही ? हे का घडते ? या प्रश्नाकडे वळले की
लक्षात येते की या सृष्टी वर हजारो वर्षे सूर्य उगवत होता , पण तो कधीच शोषित ,पीडित , वंचित यांना प्रकाशमान करू शकला नाही. मात्र या सूर्यापेक्षा ही प्रखर तेजाने आपली बुद्धी पेरणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर या महाप्रज्ञासूर्य ने अंधारात चाचपडत असणाऱ्या मानवाला ज्ञान प्रकाश दिला. अन त्यांच्यातली जगण्याची उमेद जागवली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधान उद्दिष्ट पुर्ती साठी
आपण किती झटलो ?बाबासाहेबांचीवैचारिक ,सामाजिक चळवळ,भावनिक व बोद्धीक पातळीवर कशी यशस्वी करता येईल याचा
सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचीचळवळ प्रामाणिकपणे , निष्ठा पूर्वक , अभ्यासातून व आचरणातुन पुढे नेल्या शिवाय आपल्या कडे दुसरा पर्याय नाही. हीच जन्मोत्सव दिनी डॉ बाबासाहेब यांना आदरांजली असेल.कोरोना महामारी च्या
काळात पावन स्मृतीस घरूनच वंदन करूया.

लेखक -सतिश आशाबाई खंडू शिंदे.पिंप्री
खु. ता. धरणगाव जि.जळगाव
9813336216

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार