सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ग्रा.प.सदस्यांशी साधला संवाद

चिखलीकर यांनी ग्रा.प.सदस्यांशी साधला संवाद

Sudarshan MH
  • Jan 22 2021 6:30AM
 
नांदेड दि.२२(अरविंद जाधव) नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या अनेक ग्राम पंचायत सदस्यांशी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संवाद साधला. आज जिल्ह्यातील विविध भागातून शेकडो सदस्य यावेळी उपस्थित होते.
 
नांदेड जिल्ह्यातील एक हजारहून अधिक ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत जिल्ह्यातील शेकडो ग्राम पंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यातील जास्तीत जास्त ग्राम पंचायतीवर भाजपचा झेंडा फडकाला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात आले. लोहा आणि कंधार तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला असून नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागातील ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. या अनुषंगाने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी आज दिनांक 21 जानेवारी रोजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधला.
 
नवनिर्वाचित सदस्य आणि होणाऱ्या सरपंचांनी ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे, ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करवेत, आवश्यक असणाऱ्या निधीची गरज भासल्यास तात्काळ संपर्क करावा, प्रत्येक गाव स्वयंपूर्ण झाला पाहिजे यासाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि नियुक्त होणाऱ्या सरपंचांनी प्रयत्न करायला हवेत अशा सूचना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी दिल्या.
 
लोहा तालुक्यातील टाकळगाव, वडेपुरी ,बोरगाव , दापशेड, ढाकनी, धनज खुर्द, सुगाव, वाळकी खुर्द, येळी, हातणी, डोनवाडा, कामळज, कारेगाव, शेलगाव ,धानोरा ,पेनुर आडगाव, आडांगा, जवळा दे, गोलेगाव, हरसद, बेट सांगवी, झरी तर कंधार तालुक्यातील बारूळ ,नंदनवन, मंगलसांगवी, बोरी खुर्द ,बोरी बुद्रुक, गोणार, गोगदरी, मोहिजा परांडा ,चिखलभोसी, संगुचिवाडी, पेठवडाज, शिरशी, दैठणा, कळका, पांगरा, हळदा या ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी आज खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची भेट घेतली. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वतीने नवनिर्वाचित सदस्यांचा गौरव करण्यात आला. तर विजय झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे ऋण व्यक्त केले.
 
याप्रसंगी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष चित्ररेखाताई गोरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रविण प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड दिलीप सोनटक्के, भाजपा महानगर सरचिटणीस विजय गंभीरे, माजी जि.प.सदस्य गणेशराव पाटील सावळे, अशोक पाटील धनेगावकर, साहेबराव काळे, लोहा पंचायत समिती सभापती आनंदराव पाटील ढाकणीकर, उपसभापती नरेंद्र गायकवाड, भोकर तालुका अध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर आदींची उपस्थिती होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार