सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात

मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात

Sudarshan MH
  • Jun 22 2021 9:30AM
 
मुंबई: मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल आल्यानंतर खळबळ माजली होती. यानंतर संपूर्ण मंत्रालायाची तपासणी करण्यात आली आहे. धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला पुण्यातील मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही म्हणून गृहविभागाला धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे. 
 
मेल करण्याचं कारण काय?
मंत्रालयात बाँम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल पुण्यातून आल्याचं स्पष्ट झालं आहे. शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शैलेश शिंदे याच्या मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही. या कारणामुळे म्हणून गृहविभागाला धमकीचा मेल केला, असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
 
मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून तपास सुरु
 
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल पाठवल्याप्रकरणी पुण्यातील घोरपडी भागात राहणाऱ्या शैलेश शिंदे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. शैलेश शिंदे यानं पाठवलेला मेल सांयकाळी 6.20 ला प्राप्त झाला होता अशी माहिती आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार