ग्रामीण भागांत महत्वाचा व आवडता बैल पोळा सण रद्द झाल्याने शेतकरी वर्ग हिरमुसला.
ग्रामीण भागांत महत्वाचा व आवडता बैल पोळा सण रद्द झाल्याने शेतकरी वर्ग हिरमुसला.घरीच पूजा करुन पोळा सण केला उत्साहात साजरा.
कोरोना प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले . शेतकरी पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे राम टेक - वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा सन म्हणजे बैल पोळा हा सर्वांचा आवडता सण आहे. वर्षभर कष्ट करणाऱ्या बळीराजाचा आज दिवस असतो.
तसेच या सणाची सर्व नागरिक खूप आतुरतेने वाट बघत असतात.
बाजार पेठेत सुद्धा खूप गर्दी असते. निरनिराळे बैलांना सजवण्याचा साहित्यापासून तर लहान मुलांच्या नंदी बैलांचे सुद्धा खूप दुकाने लागली असतात.. परंतु या वर्षी कोरोना च प्रादुर्भावामुळे शेजाऱ्यांच्या सर्वस्व आनंदावर विरजण पडले आहे. असे मत . शेतकरी तसेच पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे यानी व्यक्त केले.
पाहिजे तितक्या साहित्यांची विक्रेती होत नसून दुकानदारांना खूप समस्या होत आहे. बैल चि पुजा करतात परंतू . घरोघरीं पुजा करण्या करीता वाट बघीतली पण बंदी असल्यामुळें घरी कुणीच आलें नाही . कोरोना संकटमूळे शेतकरी
वर्गावर देखिल कोरोनाचे सावटमुळे साहित्य विकत घेण्याची संख्या रोडावली असल्याचे मत शेतकरी दुकानदार देवा मेहरकुळे यानी केली आहे. कोरोना संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने शासनातर्फे धार्मिक कार्यक्र म ,सन उत्सव व इतर सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली असल्यामुळें शासन निर्णयामध्ये ग्रामीण भागांत महत्वाचा व आवडता बैल पोळा सण रद्द झाल्याने शेतकरी वर्ग हिरमुसला आहे.शिवाय पोला निमित्य बैलाच्या सजावटीचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना देखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.ग्रामीण भागांत शेतकरी तसेच पंचायत समिती सदस्यनी , शेतकरी वर्गाने घरीच पूजा करुन उत्साहात हा सण साजरा केला.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प