सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना... सुनील केदार*

राज्यात *दूध संकलन बंद आंदोलन* वरून भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, घटक पक्षांनी सुरू केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी राज्य शासन नवीन योजना  घेऊन येणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन दूग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.

Snehal Joshi .
  • Jul 22 2020 2:51PM
राज्यात *दूध संकलन बंद आंदोलन* वरून भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, घटक पक्षांनी सुरू केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी राज्य शासन नवीन योजना  घेऊन येणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन दूग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. दूधाला वाढीव दर द्यावा, अनुदान प्राप्त व्हावे या मागणीसाठी राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे.दूध दरावर तोडगा करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटनेचे  प्रमुख,राज्यभरातील  विविध दूध संघांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला पशुसंवर्धन ,दूग्ध व्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे,माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, वरिष्ठ अधिकारी, शेतकरी संघटनेचे  प्रमुख,  तसेच राज्यभरातील  विविध दूध संघांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक,  बैठकीला व्हिडिओ काँन्फरन्स व्दारे सहभागी झाले होते. यावेळी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री केदार यांनी आज राज्यातील  विविध सरकारी आणि खाजगी  दूध संघांच्या पदाधिका-यांनी आणि दूध उत्पादक शेतक-यांच्या प्रतिनिधी  मांडलेल्या समस्या जाणून घेतल्या.शासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीसाठी गंभीर असून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यासाठी  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी मिळवण्यासाठी जी प्रक्रिया पुर्ण करावी लागते ती जलद गतीने करण्यात येणार असल्याचे केदार म्हणाले .कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे.राज्य शासन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संघानेही कठीण परिस्थितीमध्ये जे शक्य असेल ती मदत व आपापल्या परीने सहकार्य करावे असे पशुसंवर्धन राज्यमंत्री भरणे यांनी यावेळी आवाहन केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार