सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

डॉ.तेजल चौधरी यांचा आंतरराष्ट्रीय लायन्स प्रेसिडेंट पुरस्काराने गौरव

नंदुरबार-येथील लायन्स फेमिना क्लबच्या संस्थापक अध्यक्षा तथा सन २०१९-२० च्या रिजन चेअरमन डॉ.तेजल चौधरी यांना इंटरनेशनल लायन्स प्रेसिडेंट

Nandurbar MH
  • Dec 28 2020 4:49PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार-येथील लायन्स फेमिना क्लबच्या संस्थापक अध्यक्षा तथा सन २०१९-२० च्या रिजन चेअरमन डॉ.तेजल चौधरी यांना इंटरनेशनल लायन्स प्रेसिडेंट पुरस्काराने गौरविण्यात आला आहे. नाशिक विभागातील लायन्स क्लबच्या इतिहासात प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार नंदुरबारला पहिल्यांदाच डॉ.तेजल चौधरी यांना मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.  
डॉ.तेजल चौधरी यांनी लायन्स फेमिना क्लबतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यात माणुसकीची भिंत, पॅड मेकींग मशीन, सर्व समाजतील महिलांना एकत्र करुन महिला मेळाव्यातून विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच धुळे, दोंडाईचा, जळगांव, भुसावळ, अमळनेर, नंदुरबार व अक्कलकुवा विभागात त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे.  डॉ.तेजल चौधरी यांना बेस्ट रिजन चेअरपर्सन ऑफ दि ईअर व बेस्ट परफॉर्मर ऑफ दि डिस्ट्रीक्ट या दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत लायन्स क्लबचे इंटरनेशनल प्रेसिडेंट जंग जुल चॉई (Jung-Yul Choi) अमेरिका यांनी इंटरनेशनल लायन्स प्रेसिडेंट पुरस्कारासाठी डॉ.चौधरी यांची निवड केली आहे. डॉ.चौधरी यांचे गरजूंंसाठी समर्पित कार्य, खडतर प्रवास व सर्वांना सोबत घेवून काम करण्याची वृत्तीचे श्री.चॉई यांनी कौतुक केले आहे. नाशिक विभागातील लायन्स क्लबच्या इतिहासात प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार नंदुरबारला पहिल्यांदाच डॉ.तेजल चौधरी यांना मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ.चौधरी यांनी या पुरस्काराचे श्रेय इंटरनेशनल डायरेक्टर नवल मालु (औरंगाबाद), डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट नितीन बंग (धुळे), नंदुरबार लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष समीर शहा, चेतना शहा तसेच धुळे, जळगांव, भुसावळ, अमरळनेर, शहादा, अक्कलकुवा, दोंडाईचा, नंदुरबार येथील सर्व सदस्यांना दिले आहे. सदर पुरस्काराने डॉ.तेजल चौधरी यांनी नंदुरबार जिल्हा लायन्स परिवारात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. सदर पुरस्कार कोरोना महामारीमुळे आताच आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार