सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दोंडाईचा येथे अँक्टीवा व मोटरसायकलचा भीषण अपघात...

दोंडाईचा - दोंडाईचा-नंदुरबार रोडवरील महावितरण वीज कंपनीच्या १३२ केव्हीसमोर रात्री ८.३० वाजता अँक्टीवा मोपेड गाडी व फँशन प्रो गाडीचा समोरासमोर अपघात होऊन दोघी वाहन चालक गंभीर जखमी झाले आहे.

Sudarshan MH
  • Jun 12 2021 9:52AM

*दोघी वाहन चालकांची परिस्थिती गंभीर, पोलीसात अपघाताचा गुन्हा दाखल...*



दोंडाईचा - दोंडाईचा-नंदुरबार रोडवरील महावितरण वीज कंपनीच्या १३२ केव्हीसमोर रात्री ८.३० वाजता अँक्टीवा मोपेड गाडी  व फँशन प्रो गाडीचा समोरासमोर अपघात होऊन दोघी वाहन चालक गंभीर जखमी झाले आहे. याबाबत जखमींना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता,एकाला धुळे जिल्हा हाँस्पीटलला हलविण्यात आले आहे. वरील घटनेबाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत अपघाताच्या गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,मालपूर ता.शिंदखेडा येथील अँक्टीवा गाडी क्रमांक एम.एच.१८-ए.एम.६०२३(गाडी मालकाचे नाव मिळून आले नाही) व दोंडाईचा येथील गिरीष पाटील यांची फँशन प्रो.कंपनीची गाडी क्रमांक एम.एच.१९-डी.जे.८४१६  यांची महावितरण वीज कंपनीच्या १३२ केव्हीजवळ रात्री ८.३० वाजता समोरासमोर धडक होऊन दोघी वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र वैद्यकीय अधिकारी श्री नरोटे यांनी गिरीष पाटील गंभीर जखमी असल्याने धुळे जिल्हा रूग्णालयात हलविण्यात सांगितले तर दुसऱ्याही गाडी चालकाच्या चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत मोटर अपघाताची गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार चव्हाण करत आहेत.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार