सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दोडाईचा पोलीसानी पकडली लाखोची दारु

दोंडाईचा- येथे स्टेशन भागातील रहदारीच्या असलेल्या रस्त्यावरील नगरपालीकेच्या व्यापारी गाळ्यातील सरकारमान्य देशी

Nandurbar MH
  • Jul 21 2021 10:33AM


 *लाखोची दारु चोर वाहून नेत असताना दारु  पकडली.*

दोंडाईचा-  येथे स्टेशन भागातील रहदारीच्या असलेल्या रस्त्यावरील नगरपालीकेच्या व्यापारी गाळ्यातील सरकारमान्य देशी दारूच्या किरकोळ विक्री दुकानातुन सराईत आठ ते दहा अनोळखी तरूण चोरांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुकानाचे मधुन अर्धवट शटर तोडत हातलाँरीवर बिनधास्त दारूचे खोके वाहून चोरी करत होते.मात्र अचानक दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांची रात्रीच्या ग्रस्तच्यावेळी नजर पडताच दारूच्या खोक्यासह जागेवर लाँरी सोडत चोरांनी मिळेल त्या मार्गांनी पोबारा केला. यावेळी दुकान मालकाला रात्रीच बोलवून लाखोचा माल परत करत केल्याने दुकान मालकाने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांच्या कारकिर्दीत आणखी एक तुरा रोवला गेल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

सध्या दोंडाईचा शहरात चोरांनी व  दिवसाढवळ्या चोरीच्या घटनांनी नागरिक चांगलेच हताश झाले आहे. म्हणून पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांनी रात्रीच्या ग्रस्तीमध्ये स्वतः राहत वेगवेगळ्या वेळी टीमच्या माध्यमातून चोरांवर लक्ष केन्द्रीत केले आहे. त्याचाच भाग म्हणून  दिनांक १९ जुलै रविवार रोजी रात्री ग्रस्त मारताना स्टेशन भागातील रहदारीच्या रस्त्यावरील नगरपालीकेच्या अंडरग्राउंड व्यापारी गाळ्यातील शंकुतलाबाई गोरख चौधरी यांच्या सरकार मान्य देशी दारूच्या किरकोळ विक्री दुकानातुन रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आठ ते दहा तरूण चोरांनी दुकानाचे शटर मधुन अर्धवट तोडत दुकानातुन तीन हजार रूपये प्रती खोके प्रमाणे पंच्यात्तर टँगो पंच कंपनीचे देशी दारूचे खोके काढत बाहेर पडलेल्या बेवारस लाँरीवर एक-एकवेळा पंस्तीस-चाळीस खोके ठेवत वाहून नेत होते. यावेळी दुसऱ्या रांऊडच्यावूळी दारूचे खोके वाहत असताना रात्री साडेबारा वाजता पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी,पोलीस नाईक राकेश खांडेकर, योगेश पाटील, राकेश पावरा हे ग्रस्त करत असताना त्यांना लाँरीवर खोके वाहताना चार ते पाचजण दिसले.त्यावेळी त्यांनी सायरन वाजत त्याना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पोलीस गाडी पाहताच मिळेल त्या रस्त्याने पोबारा होण्यात यशस्वी झाले. यावेळी पोलिसांनी रस्त्यात लाँरीवर असलेले खोके गोळा करत देशी दारू किरकोळ विक्री दुकानाचे मँनेजर यशवंत गोरख चौधरी व श्यामलाल रतीलाल चोधरी यांना भ्रमणध्वनी लावत बोलविण्यात आले.यावेळी दोघी चौधरी यांनी पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक केले व आभार मानले.

याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात सरकारमान्य देशी किरकोळ विक्री दुकानाचे मँनेजर यशवंत गोरख चौधरी यांनी देशी दारूचे खोके चोरत असताना सीसीटीव्हीचे फुटेज, उर्वरित बारा  टँगो पंचचे खोके चोरीला गेल्याची लेखी खबर दिली आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार