सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जागतिक महिला दिवसाच्या आदल्या दिवशी घरघुती वादातून दिराने केले कोयत्याने जखमी केल्याची तक्रार..!

बुलढाणा : जागतिक महिला दिनाच्या आधल्या दिवशी, म्हनजेच

Sudarshan MH
  • Mar 8 2021 5:34PM
(योगेश शर्मा)
 
बुलढाणा : जागतिक महिला दिनाच्या आधल्या दिवशी, म्हनजेच ७ मार्च रोजी घरघुती वादातून दिराने आपल्या भावजय आणि दोन पुतन्यांवर कोयत्याने हल्ला करत जखमी केल्याची महिलेची तक्रार स्थानिक चिखली पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली असून पोलिसांनी दिराच्या विरुद्ध अनेक कलमांव्ये गुन्हे दाखल केले आहे. तर अश्या प्रकारचे भांडणे नेहमी होतात असे ही आरोप सदर विधवा महिलेने केले असून, घरात पुरुष नावाचं सदस्य जर नसला तर एकट्या महिलेला कोणकोणत्या यातना सोसाव्या लागतात हे जखमी महिला व त्यांच्या मुलींकडे बघून सहज समजू शकतो.
 
चिखली तालुक्यातील सवणा येथील श्रीमती शारदा वसंता हावरे यांनी दिनांक ७ मार्च रोजी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे की, मी माझ्या दोन मुलींसोबत राहते, आणि शेतात शेत मजुरी करते. वर्ष २०१५ मध्ये पती नामे वसंता हावरे यांचा मृत्यू झाला आहे. माझा दिर प्रभाकर नामदेव हावरे हा माझ्या सोबत आणि दोन मुलींसोबत लहानसहान कारणांवरून भांडण झगडा करीत असतो व आम्हाला त्रास देतो. दिनांक ६ मार्च २०२१ रात्रीचे अंदाजे नऊ साडे नऊ वाजेच्या दरम्यान घरा शेजारी राहनाऱ्या महिलेसोबत बोलत असतांना माझा दिर प्रभाकर हावरे काही एक कारण नसतांना हातात कोयता घेऊन आले आणि माझ्या मुलीच्या अंगावर हाथ उचलला, यामध्ये मुलीच्या डाव्या कान कोयत्याच्या पात्याने कापल्या गेला, तिचे रक्त निघत असतांना मी तिला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असतांना माझ्या ही हाताला मार लागून मी जखमी झाली. यावेळी माझी दुसरी मुलगी आमचे भांडण सोडविण्यासाठी आली असता त्याने तिच्या सुद्धा कानावर कोयता मारून जखमी केले तसेच आम्हा तिघा मायलेकींना हाताने मारहाण केली आहे. या अगोदर सुद्धा त्यांनी आमच्या सोबत शेतीच्या वाटणी हिस्स्याचे व पेरण्याच्या कारणावरून अशाच प्रकारची मारहाण केली होती, परंतु त्यावेळी गावातील लोकांनी आमचे भांडण आपसात मिटवल्याने मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला नव्हता. 
आमचे कुटुंबात कोणी पुरुष व्यक्ती नसल्याने आमचा फायदा घेऊन आम्हाला नेहमी लहानसहान कारणांवरून तसेच काही कारण नसतांना मारहाण करून भांडणे करीत असतो व शिवीगाळ करतो, तुम्हाला जीवे मारून टाकीन, तुमचा खून करेन असे धमक्या सुद्धा देत असल्याची तक्रार सदर विधवा महिलेने आपल्या एका मुलीला सोबत घेऊन चिखली पोलीस स्टेशनमध्ये लेखी स्वरूपात दिली तर एक मुलगी त्यांची चिखली येथिल खाजगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचेही सांगितले.
सदर महिलेच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी महिलेचा दिर नामे प्रभाकर नामदेव हावरे, रा. सवणा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला असून चिखली पो. स्टे. चे ठाणेदार पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार