सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नाफेड मार्फत फेडरेशनच्या वतीने जिल्ह्याततुर खरेदीस सुरुवात-पालकमंत्री अमित देशमुख

लातूर जिल्ह्यात नाफेड मार्फत मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने हमीभाव तुर खरेदीसाठी 18 तुर खरेदी केंद्र 1 जानेवारी 2022 पासून सुरु करण्यात आले असून शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

S.n.ranjankar
  • Jan 6 2022 2:56PM
लातूर जिल्ह्यात नाफेड मार्फत मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने हमीभाव तुर खरेदीसाठी 18 तुर खरेदी केंद्र 1 जानेवारी 2022 पासून सुरु करण्यात आले असून शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.शासनाच्या आधारभूत किंमतीचा लाभ जिल्ह्यात उत्पादीत होणाऱ्या तुर उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा यासाठी लातूर जिलहा मार्केटिंग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जिल्हयात 18 हमीभाव खरेदी केंद्रावर दिनांक 20 डिसेंबर 2021 पासून नोंदणी सुरु करण्यात आली असून तुर हमी भाव खरेदी केंद्रावर तुरीची ऑनलाईन नोंदणी करुन विक्रीस आनणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 6 हजार 300 रुपये दर मिळणार आहे.ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी लागणारे कागदपत्र पूढील प्रमाणे आहेत. आधार कार्ड, 7/12, तुर पिक पेरा, आधारकार्डशी संलग्न असणारे बँक खात्याचे पासबुकची छायाकिंत प्रत, कार्यरत असलेला मोबाईल नंबर. तरी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नोंदणी करुन शासनाच्या हमीभाव खरेदीचा लाभ घ्यावा असे, आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार