सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
नंदुरबार- येथील सुदर्शन न्युज व रघुवंशी सामाजिक संस्था संचलित रघुवंशी समाज विकास परिषद तर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही तीनशे गरीब परिवारांना फटाके वाटप करण्यात आले.
मोफत फटाके वाटपाच्या कार्यक्रमामुळे एक निराळे समाधान आणि आनंद झोपडपट्टीतील व गरीब वसाहतीतील उपस्थित सर्व गरीब मुलांच्या चेहऱ्यावर झळकताना दिसला. याप्रसंगी जिल्ह्याच्या लाडक्या खासदार डॉक्टर हिनाताई गावित, अमळनेर चे आमदार शिरीषदादा चौधरी, बीजेपीचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी तसेच नगरसेवक आकाश चौधरी, प्रशांत चौधरी, प्रसिद्ध विधिज्ञ एडवोकेट धनराज गवळी हे प्रमुख पाहुणे तर प्रमुख आयोजक म्हणून रघुवंशी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सुदर्शन न्युज चे जिल्हा प्रतिनिधी केतन रघुवंशी उपस्थित होते. रघुवंशी समाज विकास परिषद मागील अकरा वर्षांपासून गरिबांना दिवाळीनिमित्त फटाके फराळ वाटपाचा तसेच अन्य सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. गोरगरीबाच्या घरात दिवाळी आनंदाने साजरी व्हावी; हा संस्थेचा हेतू असल्याचे अध्यक्ष केतन रघुवंशी यांनी याप्रसंगी प्रस्तावनेत सांगितले. खासदार डाँ. हिनाताई गावित, आमदार शिरिष दादा चौधरी व जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी सर्व गोरगरिबांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व सुरक्षित अंतर ठेवून सावधानतेनेच दिवाळी साजरी करावी; असा संदेश दिला. या कार्यक्रमासाठी सुनील वाघेरे, अविनाश चित्रकथे, नीलेश रघुवंशी, भारत सकट, जादू सकट, गणेश ठाकरे, निलेश चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.