सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची उडाली तारांबळ*

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आणि पुसद येथे मान्सूनपूर्व पावसाने अचानक हजेरी लावली. सोमवार पासून निर्बंध हटविण्यात आल्याने शहरात नागरिकांची गर्दी होती.

Sudarshan MH
  • Jun 7 2021 7:02PM

========
*प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001*

   यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आणि पुसद येथे   मान्सूनपूर्व पावसाने अचानक हजेरी लावली. सोमवार पासून निर्बंध हटविण्यात आल्याने शहरात नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे अचानकपणे आलेल्या या मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाल्याची स्थिती निर्माण झाली होती.

     तहसील कार्यालयातील कामांसाठी आलेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला मिळेल त्या शेडचा आडोसा घेऊन उभे राहावे लागले. अचानक पाऊस आल्याने नागरिकांची धावपळ झाली तर ज्यांच्याकडे छत्री होत्या त्यांनी छत्रीचा उपयोग घेत पावसापासून बचाव केला. तर पावसामुळे घरापुढे साचलेल्या पाण्याच्या डबक्यात चिमुकल्यांनी कागदी होड्या सोडत मान्सूनपूर्व पावसाचा आनंद घेतला.पावसामुळे अनेक नाल्या तुडुंब भरल्या होत्या . सखल भागात पाणी जमा झाल्याचे दिसून आले आहे . उकाड्यापासून त्रस्त झालेल्या   नागरिकांना हवेत गारवा आल्याने काहीसा दिलासा मिळाला  मृग नक्षत्रावर पाऊस पडल्याने शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे . किमान १०० मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच शेतकऱयांनी पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार