सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धुळे -नंदुरबार विधान परिषद निवडणूक नगरध्यक्ष पिता भाजपा तर पुत्र काँग्रेसचे उमेदवार

धुळे -नंदुरबार विधान परिषद निवडणूक

Sudarshan MH
  • Nov 21 2020 11:04AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

तळोदा ः धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे मतदारांशी असलेले नाते व हितसंबंध चर्चेत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्ष यांची रणनीती कशी असणार, यावरच निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.

भाजपकडून माजी मंत्री अमरिशभाई पटेल व काँग्रेसकडून नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील रिंगणात आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील मतदारांचे उमेदवारांसोबत असणारे नाते व हितसंबंधांवर चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावरून विजयाच्या गणिताचा अंदाज बांधला जात आहे.

पिता भाजपमध्ये, तर पुत्र काँग्रेसचे उमेदवार
काँग्रेसचे उमेदवार अभिजित पाटील शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचे पुत्र आहेत.  मात्र, मोतीलाल पाटील भाजपमध्ये असून, त्यांचे पुत्र काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी करीत आहेत. त्यामुळे मोतीलाल पाटील कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे दीपक पाटील भाजपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे परिणाम
राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचेही नातेसंबंध शहादा तालुक्यात आहेत. या नातेसंबंधांच्या वापर करून काँग्रेसच्या उमेदवाराला कितपत मदत होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दोन्ही जिल्ह्यांतील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मतदार काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
शिवसेना या निवडणुकीत कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागून आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व विधान परिषद निवडणुकीचा गाढा अनुभव असणारे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी महाविकास आघाडीचा धर्म पाळत काँग्रेसच्या उमेदवाराला कशी व कितपत मदत करतात, यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार