सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धुळ्यात श्रीरामनवमीच्या मिरणुकीवर जिहाद्यांची दगडफेक आणि हिंदूंना मारहाण!

या प्रकरणी देवपूर पोलिसांनी एकूण ४ जणांवर गुन्हा नोंद केला.

Shruti Patil
  • Apr 19 2024 7:29AM

देवपूर: धुळे जिल्ह्यातील देवपूर येथे नुराणी मशिदीजवळ आलेल्या श्रीरामनवमीच्या मिरवणुकीत श्रीरामाची गाणी वाजवली म्हणून मुस्लिमांनी भाविकांवर दगडफेक करून ५ - ६ भाविकांना मारहाण देखील केली. त्यामुळे हिंदूंची अचानक पळापळ झाली. या घटनेत काही भाविक घायाळ झाले. या प्रकरणी देवपूर पोलिसांनी एकूण ४ जणांवर गुन्हा नोंद केला. ही घटना १८ एप्रिल या दिवशी सकाळी ११.४५ वाजता घडली. प्रतिवर्षी भाविक श्रीरामाची गाणी म्हणत सप्तशृंगी गडावर जातात. यामध्ये महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील भाविकांचाही समावेश असतो. त्याप्रमाणे यंदाही देवपूर येथे सकाळी शिरपूर नूरनगर येथून डीजे (ध्वनीयंत्रणा) आणि वाद्यावर श्रीरामाची गाणी वाजवत भाविक जात होते. या वेळी पोवाडेही वाजवले जात होते.

 
मुस्लिमांनी अरेरावीची भाषा करून भाविकांना डीजे  बंद करण्यास भाग पाडले, तसेच मिरवणुकीतील ५ - ६ भाविकांना मारहाणही केली. या वेळी घायाळ झालेल्या भाविकांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक रेड्डी यांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली, तसेच भाविकांशी चर्चा करून पोलीस बंदोबस्त वाढवला; मात्र या वेळी भाविक आक्रमक झाले होते. त्यांनी मुस्लिमांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार