सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवस्मारकासाठी नंदुरबारातुन राष्ट्रव्यापी आंदोलन उभारू धनंजय देसाई यांची घोषणा

संभाजी महाराजांनी राजसत्ता लाथाडून धर्मसत्ता छातीवर घेत शरीराचे हाल करून पण धर्म सोडला नाही.

Nandurbar MH
  • Jan 20 2021 7:13PM
सुदर्शन न्युज नंदुरबार केतन रघुवंशी.
नंदुरबार(प्रतिनिधी)- संभाजी महाराजांनी राजसत्ता लाथाडून धर्मसत्ता छातीवर घेत शरीराचे हाल करून पण धर्म सोडला नाही.देशात देशद्रोही प्रवृत्या उजळमाथ्याने हिंडत आहेत त्यांच्या बिमोड करण्यासाठी शिवकार्याला चालना द्या असे आवाहन करीत अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी नंदुरबारातुन राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केली.
 
धनंजय देसाई आज बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता शिवराणा प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने त्यांच्या संस्थापक अध्यक्ष अर्जुन मराठे, उपाध्यक्ष अर्जुन राजपूत यांनी सत्कार केला. त्याप्रसंगी ते बोलत होते. शहरात आल्यानंतर धनंजय देसाई यांनी नाट्य मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई मार्गदर्शन करतांना म्हणाले, अरबी समुद्रातील शिवछत्रपतींच्या स्मारकासाठी हस्तक्षेप नको. स्मारक लवकर उभा रहावं यासाठी नंदुरबारातून राष्ट्रीय आंदोलन पुकारणार आहोत.अफजल गुरू,अजमल कसाब यांना फाशी होऊ नये म्हणून देशात उपोषण करणारी पिलावळ आहेत. मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपी याकूब मेमनचा प्रेतयात्रेत लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होतो परंतू, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या अंत्ययात्रेला राजकीय, महत्त्वाच्या व्यक्ती शिवाय कोणीही फिरकले नव्हतं. एनआरसी, सीएएला विरोध करणारी देशद्रोही प्रवृत्ती देशात उजळमाथ्याने वावरत आहे. अशा प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी शिवप्रेमींनी शिवकार्य घेऊन पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
 
यावेळी शिवराणा प्रतिष्ठानचे संस्थापक
अध्यक्ष अर्जुन मराठे व संस्थापक उपाध्यक्ष
अर्जुन राजपूत
शाखाध्यक्ष अजय महाले, शाखा उपाध्यक्ष
देवा मराठे, सचिव सचिन कोळी, शाखा
संघटक राहुल तांबोळी, अविनाश माळी,
मुकेश राजपूत, संग्राम ठाकुर, लल्ला मराठे,
प्रविण पाटील, दादु मराठे, रमेश राजपूत,
आनंद मराठे, घारु कोळी, गोविंदा चौधरी,
कुणाल माळी, दादाभाई मिस्तरी, भैय्या
पहेलवान, स्वप्निल पाटील, नरेंद्र मराठे, रविंद्र
राजपूत, सोनु वराडे, भगतसिंग राजपूत,जितेंद्र मराठे. जयेश
सोनार, गौरव चौधरी, धिरज भोई, भुषण
चौधरी, बंटी तवर, योगेश राजपूत, संग्राम
राजपूत, दादा कोळी आदी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार